सुरत : महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2025) उत्सव आज संपूर्ण देशभरात मोठ्या उस्ताहाने साजरा होत आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशावेळीच गुजरातच्या एका मंदिरातून प्राचीन शिवलिंगाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या बातमीने परिसरात खळबळ उडाली आहे. (Theft case)
Marathi Bhasha Gaurav Din : गिरगावातल्या शाळेत होणार ‘अभिजात मराठी’ ची गर्जना!
पोलिसांच्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे काल पुजाऱ्याने पुजेसाठी मंदिराचा दरवाजा उघडला, तेंव्हा आतले दृष्य पाहून त्याला धक्का बसला. पुजाऱ्याने जसा मंदिराचा दरवाजा उघडला तेंव्हा त्याला शिवलिंग जाग्यावर नसल्याचे दिसून आले. यानंतर पुजाऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली. भीडभंजन भवनेश्वर महादेव मंदिर देवभूमी व्दारका जिल्ह्यात समुद्राच्या किनाऱ्यावर कल्याणपूर येथे वसले आहे. हे मंदिर खूप प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. मात्र, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी घडलेल्या या चोरीच्या प्रकाराने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी शिवलिंग शोधण्यासाठी पथके करून तपासाला सुरूवात केली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेशन, क्राईम ब्रांच, स्पेशन ऑपरेशन ग्रुप आणि फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम सहभागी झालेली आहे. डॉग स्क्वॉडची देखील मदत घेतली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी भीडभंजन भवनेश्वर महादेव मंदिराच्या पुजारीने या घटनेची माहिती दिली की, मंदिरात शिवलिंगाची चोरी झालेली आहे.त्यावरून आम्ही या ठिकाणी येउन पाहणी केली आहे. या शिवलिंगाच्या शोधासाठी आम्ही पथके तयार केली आहेत. हे शिवलिंग समुद्रातही लपवले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही विशेष स्कुबा डायव्हर्स आणि पोहणाऱ्यांनाही बोलावले आहे. हे मंदिर प्राचीन असून, भाविकांची या मंदिराप्रती मोठी श्रद्धा जोडली गेली आहे.