Saturday, March 15, 2025
Homeक्राईमFraud : ऑनलाईन बोगस ट्रेडिंग अ‍ॅपमधून सव्वाकोटींना गंडा!

Fraud : ऑनलाईन बोगस ट्रेडिंग अ‍ॅपमधून सव्वाकोटींना गंडा!

ठाणे : ऑनलाईन अथवा बोगस अ‍ॅपद्वारे फसवणुकीच्या (Online Fraud) घटना होऊन देखील पैशांच्या लालसेपायी उच्च शिक्षित व्यक्तीदेखील अशा आमिषाला बळी पडत असल्याची घटना कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ट्रेडिंग अ‍ॅपमधून मोठा नफा मिळणार असल्याचे बघून आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची तब्बल एक कोटी २० लाखांची फसवणूक झाली आहे. (Fraud Case)

मराठी भाषा गौरव दिनी ५१ नव्या ग्रंथांचे प्रकाशन

कोपरी भागात राहणारे विनोद शर्मा ५५ (नाव बदलून) हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. ट्रेडिंगसारख्या ऑनलाईन अ‍ॅपद्वारे जास्त पैसे मिळतील याची ते चाचपणी करत होते. यावेळी एका ट्रेडिंग अ‍ॅपमधून मोठा नफा मिळेल या आशेने त्यांनी सुरुवातीला काही रक्कम गुंतवली. या अ‍ॅपवरील ट्रेडिंग कंपनीने पहिल्या खेपेत सुमारे ४० ते ५० हजारांचा नफा झाला. त्यामुळे या अ‍ॅपमधून आपण रग्गड पैसे कमवू ही लालसा विनोद यांच्या मनात निर्माण झाली.

जानेवारी ते फेब्रुवारी या सव्वा ते दीड महिन्याच्या कालावधीत अ‍ॅपवर दर्शवल्याप्रमाणे विनोद हे कधी चार लाख कधी दोन लाख असे पैसे गुंतवत गेले. तुम्हाला लवकरच अधिक पैसे मिळतील अशी बतावणी समोरून करण्यात येत होती. त्यामुळे आपल्याला आज ना उद्या जास्त पैसे मिळतील या विश्वासावर विनोद होते. मात्र थोड्या कालावधीत आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी सायबर विभागाकडे अर्ज करण्यात आला आहे. (Fraud)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -