मुंबई : मंत्रालयातल्या सुरक्षा जाळीवर एका तरुणाने उडी मारुन आंदोलन केलेल्याची घटना आज, मंगळवारी घडली. आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनीही सुरक्षा जाळीवर उड्या मारत त्याला ताब्यात घेतले. साधारण अर्धा तास सुरु असलेल्या या प्रकारामुळे मंत्रालयात आलेल्या अभ्यागतांनी एकच गर्दी केली होती. सुदैवाने मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळीत हा तरुण अडकल्याने मोठा अनर्थ टळला.
मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांच्या वाटपाचे धोरण राबवा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यासंदर्भातील माहितीनुसार आंदोलक तरुण महसूल खात्यासंदर्भात तक्रारीच्या निवारणासाठी मंत्रालयात आला होता. परंतु, त्याचे काम होत नसल्यामुळे संदर तरुण पुरता वैतागला होता. त्यामुळे त्याने इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यावेळी युवकाच्या हातात महसूल विभागात सात-बारा नावावर होत नाही, अशी पत्रके होती. ती पत्रके उडवत तरुणाने संरक्षण जाळ्यांवर उडी मारली. युवकाने जाळीवर उडी घेतल्यानंतर पोलिसांनीही सुरक्षा जाळीवर उड्या मारत जाळीवरच्या तरुणाला सुरक्षित बाहेर काढले. साधारणरणे 20 ते 30 मिनीटे हा गोंधळ सुरू होता. आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेनंतर मोठा पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.आणि तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.या तरुणाचं नाव अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच अशा आंदोलनाचे नेमके कारण आणि हेतू काय होता..? याचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली.