मुंबई (खास प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, न्यायालय या संदर्भात शासनाला काय निर्देश देते आणि पुढील सुनावणीची तारीख काय देते याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात की, मे महिन्यांत की ऑक्टोबरमध्ये जाणार हे या सुनावणीतून स्पष्ट होईल.
मुंबई महापालिकेसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील पाच ते सहा वर्षांपासून झालेल्या नाहीत. या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. अनेक महिन्यांपासून न्यायालयात पाचिका सुनावणीसाठी आली नव्हती.
२८ जानेवारी २०२५ रोजी याची सुनावणी होऊन लवकरच याबाबतचा निर्णय दिला जाईल आणि निवडणुकीचा मार्ग खुला होईल, असे बोलले जात होते; परंतु न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख २५ फेब्रुवारीपर्यंत पुढे उकलल्याने महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यातच होतील अशाप्रकारचे तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे; परंतु काही विधी तन्ज आणि निवडणूक विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सर्वोच्च न्यायालय नक्की पुढील तारीख देते की काही स्पष्ट निर्देश देते याकडे सर्वांचे लक्ष असेल.
मुंबई महापालिकेचे २२७ प्रभागांच्या तुलनेत २३६ प्रभाग आघाडी सरकारच्या काळात करण्यात आले असून जुलै २०२२ मध्ये सेना भाजपा सरकार आल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द केला. याला विरोधकांनी आक्षेप नोंदवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती, या याचिकेवर न्यायालयाने शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार २२७ प्रभाग राखण्याबाबत निर्णय दिल्याने मा निर्णयाविरोधात विरोधी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यामुळे २२७ की २३६ प्रभाग, ओबीसी या अशा विविध याचिकेंची एकत्रित सुनावणी होणार आहे.