Mumbai News : नाट्यरसिकांची होणार गैरसोय! उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर बंद

  159

मुंबई : मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी सुगीचा काळ असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पश्चिम उपनगरांतील प्रेक्षकांना नाट्यदुर्भीक्षाला तोंड द्यावे लागणार आहे. परिसरातील एकमेव मोठे नाट्यगृह बोरिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर (Prabodhankar Keshav Sitaram Thackeray Natya Mandir) डागडुजीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विशेषतः कांदिवली आणि बोरिवली परिसरात इतर नाट्यगृह नसल्यामुळे येथील रसिकप्रेक्षकांना दीड ते दोन तासांचा प्रवास करून शहरातील नाट्यगृहात यावे लागणार आहे. मात्र ऐन उन्हाळाच्या सुट्टीत मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेले १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून मुंबई उपनगरातील रसिकप्रेक्षकांची गैरसोय होणार आहे.



ऐन सुट्टीच्या हंगामातच प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिराच्या मुख्य नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे रसिकप्रेक्षक व निर्मात्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी लघु नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम पूर्ण झाले असून सुट्टीच्या काळातही लघु नाट्यगृह व तालीम दालने सुरु राहणार आहेत. डागडुजीच्या कामाअंतर्गत मुख्य नाट्यगृहातील छत गळतीमुक्त करणे, नवीन बैठकव्यवस्था, फरशा बदलणे, रंगमंचाला नवा साज, कलाकार व तंत्रज्ञांच्या कक्षाची दुरुस्ती, रंगकाम, प्रकाशयोजना, विद्युत यंत्रणेत बदल यांसह नाट्यगृहाच्या परिसराची डागडुजी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पश्चिम उपनगरातील प्रेक्षकांना, नाट्यरसिकांना विलेपार्ले येथील मुंबई महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह गाठावे लागणार आहे किंवा जवळपास दीड ते दोन तासांचा प्रवास करून शहर आणि पूर्व उपनगरांतील नाट्यगृहांतील प्रयोग पहावे लागणार आहेत.


उन्हाळी सुट्टीच्या काळात म्हणजेच एप्रिल ते मे महिन्यांत नाट्यप्रयोगांना उत्तम प्रतिसाद असतो. मात्र पावसाळ्यात नाट्यगृहाच्या छताचे काम करता येणार नाही, त्यामुळे डागडुजीचे काम उन्हाळ्याच्या सुट्टीत होणार असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे’, असे ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा

एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वी

मुंबई : राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा

आता मेट्रो-३ रविवारीही सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही मेट्रो ३ ची सेवा आता रविवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. मेट्रो ३

गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुले राहणार 'जिजामाता उद्यान'

मुंबई: गणेशोत्सवाच्या सुट्टीतही 'जिजामाता उद्यान' बुधवारी पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. मात्र २८ ऑगस्ट या दिवशी

'आपले सरकार' पोर्टलवरील सेवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून द्याव्यात', मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात, या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत