
नाशिक : उद्या राज्यभरात महाशिवरात्र सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या महाशिवरात्रीनिमित्त लाखो भक्त भगवान शिवचे दर्शन घेण्यासाठी शिवमंदिरात जातात. नाशिकमधील (Nashik News) रामकुंड परिसरातील श्री कपालेश्वर मंदिरातही (Kapaleshwar Mandir) दरवर्षी महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने रामकुंड परिसरातील काही मार्गावरील वाहतुकीस मज्जाव केला आहे.

नवी दिल्ली : महापालिका निवडणुकीच्या संदर्भात (SC Hearing on Corporation Election) सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता ४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील ...
बुधवारी (दि.२६) पहाटे पाच ते रात्री १२ वाजेपर्यंत रामकुंडावर येणाऱ्या वाहनांचा प्रवेश नसेल. कपालेश्वर मंदिर, पंचवटी कारंजा, ढिकले वाचनालय, सदरदार चौक-काळाराम मंदिर या मार्गाने मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक बंद असणार आहे. यावेळी हातगाड्या, बैलगाड्या, सायकल, मोटार सायकल, मोटार गाड्या व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
कोणत्या मार्गावर वाहतूक बंदी?
ढिकले सार्वजनिक वाचनालयाकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद असेल. मालेगाव स्टॅण्डकडून कपालेश्वर मंदिराकडे, सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारी, गाडगे महाराज पुलाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारी, महाराष्ट्र आयर्न वर्क्सकडून खांदवे सभागृहाकडे जाणारी तसेच मालवीय चौकाकडून खांदवे सभागृहाकडे जाणारी वाहतूक बुधवारी दिवसभर बंद असेल. (Nashik News)