Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीGBS : जीबीएसची वाढती दहशत! मुंबईत ३ नवे रुग्ण दाखल

GBS : जीबीएसची वाढती दहशत! मुंबईत ३ नवे रुग्ण दाखल

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस जीबीएसचे संकट वाढत चालले आहे. सातत्याने जीबीएसची (GBS) लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशातच आता मुंबईत (Mumbai) जीबीएसचे तीन नवे रुग्ण दाखल झाले आहेत. या रुग्णांवर सध्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात (JJ Hospital) उपचार सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील जीबीएसच्या रुग्णांचा एकूण आकडा २१४ वर गेला आहे.

Pink E-Rickshaw : अमरावती ई पिंक- रिक्षासाठी केवळ २९३ महिला ठरल्यात पात्र

मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन-तीन दिवसांत धुळे, ठाणे आणि वाडा येथून आलेले जीबीएस बाधित रुग्णांवर मुंबईत उपचार सुरु आहेत. यापैकी एा रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर इतर दोन रुग्णांना सर्वसाधारण वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जीबीएसचे मुख्यत: प्रौढ रुग्ण रुग्णालयात येत आहेत, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सुरवसे यांनी दिली.

काय आहेत लक्षणे?

दूषित अन्न किंवा पाणी घेतल्यामुळे कॅम्पिलोबॅक्टर विषाणू संसर्ग होतो. यामुळे जुलाब आणि पोटदुखी होऊ शकते. काही जणांमध्ये या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. डेंग्यू, चिकुनगुनिया आणि इतर संसग्दिखील याला कारणीभूत ठरू शकतात. जुलाब (रक्तासह होऊ शकतो), पोटदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या अशी याची लक्षणे आहेत.

काय आहेत उपाय?

नेहमी पाणी उकळून प्या. सकस व ताजे अन्न घ्या. भाज्या व फळे स्वछ धुऊन घ्या. चिकन, मासे चांगले शिजवून घ्या (७५ अंश सेल्सिअस तापमानाला), अर्थवट शिजलेले अन्न व कच्चे अंडे खाणे टाळा. जेवणापूर्वी आणि टॉयलेटनंतर हात साबणाने स्वछ धुवा. दुसत्यांसोबत भांडी वा अन्न वाटून खाणे टाळा. किचन स्वच्छ ठेवा. कच्चे व शिजलेले अन्न वेगवेगळे ठेवा, स्वयंपाकघर व भांडी स्वच्छ ठेवा. हा आजार सामान्यत दुर्मीळ आहे; पण अलीकडील काही दिवसांत पुण्यातील सिंहगड रोड भागात याची प्रकरणे वाढली आहेत. अशा स्थितीत सुरुवातीला जाणवणारी लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. अतिसार किंवा खोकला येणे, पाय किंवा हातात अचानक अशक्तपणा जाणवणे, चालता न येणे किंवा शरीर बधिर होणे, रक्तासह अतिसार होणे अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -