Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Earthquake: बंगालच्या खाडीमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, कोलकातासह अनेक शहरांमध्ये बसले धक्के

Earthquake: बंगालच्या खाडीमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, कोलकातासह अनेक शहरांमध्ये बसले धक्के

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सीमोलॉजीच्या माहितीनुसार हा भूकंप सकाळी ६.१० वाजता आला होता.

सकाळी सकाळीच भूकंपाचे धक्के बसल्याने कोलकातामध्ये राहणारे लोक भयभीत झाले आणि घराबाहेर पडले. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के कोलकाताशिवाय पश्चिम बंगालमधील दुसऱ्या शहरांनाही जाणवले.

नॅशनल सीस्मॉलॉजी सेंटरच्या माहितीनुसार २५ फेब्रुवारीला सकाळी ६.१० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्र बिंदू बंगालची खाडी ९१ किमी खोल होता.

 

हिमाचलच्या मंडीमध्ये रविवारी आला होता भूकंप

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात रविवारी सकाळी ८.४२ वाजता मध्यम तीव्रतेचा भूकंप आला होता. मंडीच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. दरम्यान,यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्तहानी झाली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा