Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटी, मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा

Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटी, मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून तीन वेगवेगळी सर्वोच्च मानांकने


मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या तीन स्वतंत्र राष्ट्रीय मूल्यमापनांमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटी (Adani Electricity) मुंबई लि. ने पुन्हा एकदा सर्वोच्च मानांकने मिळवून अतुलनीय उत्कृष्टता दाखवली आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन च्या तेराव्या एकात्मिक मानांकन उपक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कंपनीला पहिले मानांकन मिळाले होते. सर्वोत्तम ग्राहक सेवेसाठी रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनच्या डिस्कॉम ग्राहक सेवा मानांकनात ए प्लस हे मानांकन मिळाले. आता पहिल्यावहिल्या वितरण कंपनी मानांकन अहवाल २०२३-२४ मध्ये देशातील पहिल्या क्रमांकाची नागरी आणि एकंदर ऊर्जा कंपनी असे मानांकन मिळाले आहे. यामुळे अदाणी इलेक्ट्रिसिटीने कामकाजातील उत्कृष्टता, ग्राहककेंद्री सेवा आणि पर्यावरणपूरकता या तिन्ही विभागात आपली असामान्य कामगिरी दाखवून दिली, असे सांगितले जात आहे.



अदानी इलेक्ट्रिसिटी च्या असामान्य कामगिरीमुळे त्यांची अनेक बाबीतील सर्वोत्तम कामगिरी दिसून आली. या मानांकनात ९३.५ एवढे एकत्रित गुण मिळवताना अदाणी इलेक्ट्रिसिटीने अन्य सर्व नागरी ऊर्जा कंपन्यांना मागे टाकले आहे. यातच, अदाणी इलेक्ट्रिसिटीला सर्वोत्कृष्ट कामकाज (९९.८ गुण), ग्राहक सेवा (९०), पर्यावरणपूरक ऊर्जा खरेदी निर्बंधांचे पालन (१०० टक्के), सहजसंवादी मीटरिंग यंत्रणा (१०० टक्के), आणि साधन संपत्तीचे परीपूर्ण नियोजन (९१.७) या गटांमध्येही सर्वोच्च स्थान मिळाले आहे. एवढे सर्वोत्तम गुण मिळाल्याने कंपनीची कामकाजातील विश्वासार्हता, ग्राहकांचे समाधान होण्याबाबतचा निर्धार आणि वीज पुरवठ्यात पर्यावरणपूरक ऊर्जेचे स्रोत एकत्रित करण्यातील नेतृत्व अधोरेखित होते, असे दाखवून दिले जात आहे.



पुरस्कारांचे मुंबईसह भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठीचे महत्व


अदानी इलेक्ट्रिसिटीला सतत मिळणारा पहिला क्रम याचा अर्थ विश्वासार्ह आणि अखंड वीजपुरवठा, ग्राहक सेवेतील तक्रारींचे सुलभ निवारण, पारदर्शक आणि अचूक बिलिंग यंत्रणा आणि सोयीस्कर असा डिजिटल संवाद, असा होतो. तर हे मानांकन मिळाल्याने राष्ट्रीय पातळीवरही अदाणी इलेक्ट्रिसिटीने या उद्योगात नवे मापदंड निश्चित केले आहेत व त्यायोगे कामगिरीत उत्कृष्टता कशी दाखवावी, ग्राहक केंद्र कामकाज कसे असावे, हे तर त्यांनी दाखवून दिले आहेच, पण पर्यावरणपूरक ऊर्जेचे एकत्रीकरण हे भारताच्या ऊर्जा क्षेत्राचे क्षितिजच बदलून टाकतील व त्याद्वारे स्वच्छ उर्जेकडे होणाऱ्या संक्रमणाच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला बळ मिळेल, असा याचा अर्थ आहे.


सतत तीन राष्ट्रीय प्रतिष्ठित मूल्यमापनात मिळालेला पहिला क्रमांक ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून ही बाब आम्ही नम्रपणे स्वीकारतो. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणे, ग्राहकांचे समाधान होईल याकडे प्राधान्याने लक्ष देणे आणि पर्यावरणपूरकता यांच्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर या मानांकनांमुळे शिक्कामोर्तब झाले आहे, असे कंदर्प पटेल, अदानी इलेक्ट्रिसिटी, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालकांनी म्हटले.

Comments
Add Comment