मुंबई: वास्तुशास्त्रानुसार सकाळी जर काही संकेत तुम्हाला दिसले तर हे शुभ ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार सकाळी काही संकेत दिसणे याचा अर्थ आहे की घरात जर आर्थिक त्रास असेल तर तो दूर होऊ शकतो.
वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच जर तुमच्या कानामध्ये शंखाचा आवाज येत असेल तर हे शुभ संकेत असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार शंखाचा आवाज ऐकल्याने घरात माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत असू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, सकाळी घराबाहेर पडताना जर तुम्हाला सकाळी उठल्यावर झाडू काढताना दिसले तर हे शुभ संकेत आहेत. जर तुम्हाला हे सकाळच्या वेळेस चित्र दिसत असेल तर लवकरच तुमचा त्रास दूर होणार आहे.
वास्तुशास्त्रानुसार जर घरात काळ्या मुंग्यांची झुंड किचनमध्ये जेवण्याच्या गोष्टीवर तुटून पडली तर हे धनलाभाचे संकेत असू शकतात.