Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीपुण्यात मारणे टोळीच्या गुंडांविरोधात 'मकोका' अंतर्गत कारवाई

पुण्यात मारणे टोळीच्या गुंडांविरोधात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

पुणे : कोथरुडमध्ये १९ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील देवेंद्र जोग नावाच्या मुलाला मारहाण झाली. गुंड गजा मारणे याच्या टोळीमधील गुंडांनी हे कृत्य केले होते. या प्रकाराने मंत्री मुरलीधर मोहोळ संतापले, त्यांनी पोलिसांना इशारा दिला. हा इशारा मिळताच पुणे पोलिसांनी मारणे टोळी विरोधात कठोर पवित्रा घेतला आहे. पहिल्यांदाच मारणे टोळीच्या गुंडांविरोधात मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act or MCOCA) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील देवेंद्र जोग नावाच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी ३ जणांविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुणे पोलीस मारणे टोळीच्या २७ गुंडांच्या शोधात आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारणे टोळीतील गुंडांची माहिती मागवून घेतली आहे. मारणे टोळीतील सदस्यांची मालमत्तांची माहिती डीडीआर करुन त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओ कडून मागवली आहे. काही गुन्हेगार पुण्याबाहेर जाऊन गुन्हे करत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि योग्य ती कारवाई करा, असे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील देवेंद्र जोग नावाच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ यांना अटक केले आहे.आरोपींची रस्त्यावर धिंड काढून नंतर त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. याआधी पोलिसांनी गेल्या वर्षी सर्व आरोपींची ओळख परेड घेतली होती, त्यावेळी सर्वांना तंबी देण्यात आली होती. सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण होईल अशी कोणतीही पोस्ट करायची नाही, मात्र इन्स्टाग्रामवर गजा मारणेचे पुण्याचे मालक म्हणून अनेक रिल्स अजूनही पोस्ट केले जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -