Saturday, October 18, 2025
Happy Diwali

मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयाला मारहाण; गुंड गजा मारणेसह टोळीवर मकोका

मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयाला मारहाण; गुंड गजा मारणेसह टोळीवर मकोका

पुणे : भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण करणाऱ्या गजा मारणे टोळीच्या तीन आरोपींवर मकोका (MCOCA) लावण्यात आला आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. यासोबतच टोळीचा प्रमुख गजा मारणे याच्यावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

कोथरूडमध्ये भरदिवसा हल्ला, आरोपींना धडा शिकवला

कोथरूड परिसरात भरदिवसा एका तरुणाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत मारणे टोळीशी संबंधित तिन्ही आरोपींना अटक केली. या गुन्हेगारांचा परिसरात धाक असल्याने नागरिक साक्षीदार होण्यास किंवा तक्रार करण्यास घाबरत होते. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेत या आरोपींना कोठडीची मागणी न्यायालयात केली, आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एच. वानखेडे यांनी पोलिस कोठडी मंजूर केली.

गुन्हेगारी टोळीला मोठा धक्का

या तिन्ही आरोपींना कोथरूड पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवत या आरोपींना धडा शिकवत त्यांची धिंड काढली. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा अतिरिक्त आरोप दाखल करण्यात आला असून पुणे पोलिसांनी ही कारवाई गजा मारणे टोळीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, टोळीच्या नेस्तनाबूत करण्यासाठी पोलिसांची कठोर भूमिका राहील.

गजा मारणे टोळीवरील पुढील कारवाई

पोलिसांच्या रडारवर सध्या टोळीतील २७ जण आहेत. याशिवाय टोळीप्रमुख गजा मारणे याच्यावरही कठोर कारवाई केली जाणार आहे. या गुन्हेगारांची आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी त्यांची मालमत्ता व वाहनांची माहिती डीडीआर आणि आरटीओकडून मागवण्यात आली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

पोलिसांचा कडक इशारा – कायदा हातात घेणाऱ्यांची गय नाही

अमितेश कुमार यांनी नागरिकांना विश्वास देत सांगितले की, कुणीही कायदा हातात घेऊ नये. पुणे पोलिसांकडून अशा गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी निर्भय राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >