Friday, March 28, 2025
Homeक्रीडाVirat Kohli: कोहलीने रचला इतिहास, बनला जगातील पहिला खेळाडू

Virat Kohli: कोहलीने रचला इतिहास, बनला जगातील पहिला खेळाडू

मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक ऐतिहासिक रेकॉर्ड बनवला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडला आहे. कोहली आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १४ हजार धावा करणारा खेळाडू बनला आहे.

कोहलीने हे यश २२९ व्या वनडे सामन्यात २८७व्या डावात मिळवले आहे. याआधी हा रेकॉर्ड सचिनच्या नावावर होता. सचिनने ३५०व्या डावात हा रेकॉर्ड केला होता. सचिननंतर श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा नंबर लागतो. त्याने ३७८ डावांत १४ हजार वनडे धावा केल्या आहेत.

कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध २२ धावा केल्या होत्या. तेव्हा या ऐतिहासिक रेकॉर्डपासून १५ धावा दूर होता. मात्र आता पाकिस्तानविरुद्ध दुबईत खेळवण्यात आलेल्या सामन्यात हा इतिहास रचला आहे. कोहलीने १३व्या षटकांतील दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकत रेकॉर्ड बनला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध या सामन्यात एक धाव करत सचिन तेंडुलकरला मागे टाकले. तो सलामीवीर ९००० धावा करणारा फलंदाज आहे. रोहितने १८१ वनडे डावांत सलामीवीर म्हणून ही कमाल केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -