Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Virat Kohli: तब्बल १५ महिन्यांनी विराटचे शतक, पाकच्या गोलंदाजांना धुतले

Virat Kohli: तब्बल १५ महिन्यांनी विराटचे शतक, पाकच्या गोलंदाजांना धुतले
दुबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. त्याने तब्बल १५ महिन्यांनी वनडे क्रिकेटमध्ये आपले शतक ठोकले. त्याने ही कामगिरी रविवारी केली. कोहलीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १११ बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले.

वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीचे हे ५१वे शतक आहे. असे करणारा तो जगातील पहिला क्रिकेटर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

खरंतर, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतर्गंत रविवारी भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. सामन्यात पाकिस्तानने २४२ धावांचे आव्हान दिले होते. याच्या प्रत्युत्तराला भारतीय संघाने हा सामना ६ विकेट राखत जिंकला.

कोहलीचे १५ महिन्यांनी शतक


सामन्यात कोहलीची बॅट चांगलीच तळपली. त्याने १११ बॉलमध्ये शतक ठोकले. या दरम्यान त्याने ७ चौकार ठोकले. कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये तब्बल १५ महिन्यांनी शतक ठोकले. याआधी त्याने १५ नोव्हेंबर २०२३मध्ये शतकी खेळी केली होती. तेव्हा कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ११७ धावा केल्या होत्या.
Comments
Add Comment