पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. वडगाव शेरी भागात शनिवारी मध्यरात्री एका टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
https://prahaar.in/2025/02/23/farmers-holi-will-be-celebrated-with-a-bang-the-19th-installment-of-pm-kisan-yojana-will-come-on-this-date/
टोळक्याकडे लाकडी दांडके होते. त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. दोन रिक्षा आणि १० ते १२ दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी गोंधळ पाहून घराबाहेर येण्यासही घाबराट दर्शवली. टोळक्याने वाहनांच्या काचा फोडल्या, काही गाड्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, तसेच लोकांना शिवीगाळही केली.