Friday, May 23, 2025

कोकणताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसिंधुदुर्ग

Tarkarli Beach : तारकर्ली समुद्रात बुडून पुण्याच्या दोघा पर्यटकांचा मृत्यू

Tarkarli Beach : तारकर्ली समुद्रात बुडून पुण्याच्या दोघा पर्यटकांचा मृत्यू
मालवण : तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे-हडपसर येथील रोहित बाळासाहेब कोळी (२१) व शुभम सुनील सोनवणे (२२) या दोघा पर्यटकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रकिनारी घडली.



हवेली तालुक्यातील कुश गदरे (२१), रोहन डोंबाळे (२०), ओंकार भोसले (२४), रोहित कोळी (२१), शुभम सोनवणे (२२) हे युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात आत ओढले गेले. किनाऱ्यावरील स्थानिकांनी तसेच पर्यटन व्यावसायिकांनी तत्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने शोध कार्य सुरू करण्यात आला.
Comments
Add Comment