Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीSolapur News : व्यायामासाठीच्या दोरीचा गळफास बसून विद्यार्थ्याचा मृत्यू

Solapur News : व्यायामासाठीच्या दोरीचा गळफास बसून विद्यार्थ्याचा मृत्यू

सोलापूर : आईच्या व्यायामासाठी तयार केलेल्या दोरीचा गळफास बसून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना अंकोली, ता. मोहोळ येथे घडली. हर्षवर्धन विनायक इंगळे (वय- १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता दहावीत शिकत होता. परीक्षेच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची अकस्मात मयत अशी मोहोळ पोलिसात नोंद झाली आहे.

https://prahaar.in/2025/02/23/farmers-holi-will-be-celebrated-with-a-bang-the-19th-installment-of-pm-kisan-yojana-will-come-on-this-date/

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत हर्षवर्धनच्या आईला अर्धांगवायूचा आजार झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना व्यायामाचा सल्ला दिला होता. व्यायामाने आईला लवकर बरे वाटावे म्हणून घराच्या पत्र्याच्या अँगलला एक दोरी बांधून तिला लोखंडी सळईचा त्रिकोणी अँगल बनविला होता व त्याला मूठ लावलेली होती. त्याद्वारे आईचा व्यायाम सुरू होता.

दरम्यान, आईकडे जाताना घरात अंधार होता त्यामुळे हर्षवर्धनला ती लोंबकळत असलेली दोरी दिसली नाही. त्यामुळे तो तसाच पुढे गेला असता सदर दोरीचा हर्षवर्धनच्या गळ्याला फास लागला व तो गतप्राण झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -