Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमानसिक स्वभावाच्या छटा

मानसिक स्वभावाच्या छटा

पूर्णिमा शिंदे

मन शुद्ध असेल, तर आपण आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्तींचा विचारही तसाच करतो. त्यासाठी स्वभाव, चिंतन करण्यासाठी मन शुद्ध आणि प्रांजळ असले पाहिजे. नितळ असलं पाहिजे. आपण म्हणतो ना! मोकळ्या मनाचा माणूस! नितळ मनाचा माणूस! पण हे मोकळे मन प्रत्येकाचे नसते. आपण आपल्या मनाला आवर घालणे. बंधनात ठेवणे किंवा मनाचे मालक होणे या सगळ्या आपल्या मनाच्या लीला आहेत. स्वतःचा स्वतःवर ताबा. स्वतःचा स्वतःवर विजय असावा. स्पर्धा ही स्वतःशीच असावी. तुलना ही स्वतःशीच असावी. हे ज्याला जमलं ते खरं आत्मचिंतन! मनाची शुद्धता काय? तर प्रत्येकाला भेटल्यावर आपण त्याच्या मनात काय चाललंय हे सांगू शकत नाही. पण त्याच्या कृतीतून देहबोली, भाषा, सूर, आवाज, स्वर, संवाद यातून उमटतो. यावरूनच आवडनिवड, सकारात्मक- नकारात्मकता कळत असते. पण माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे समाजातील असणाऱ्या घटनांचा त्याच्या मनावर निश्चितच परिणाम उमटत असतो. आपण स्वतः कितीही निर्मळ मनाचे असलो तरीही आजूबाजूच्या मनाच्या विरोधातल्या घटना सहन कराव्या लागतात. प्रत्येकवेळी आपल्या मनासारखंच होईल असे नसते! आणि मनासारखं करणे म्हणजे अधिकार गाजवणे. माझ्या बाजूला लेले काकू राहत होत्या. स्वभाव खूप सहिष्णू साध्या भोळ्या पण बिचाऱ्या काकांच्या जाचाने खचल्या होत्या. स्वतः शिक्षिका असून सुद्धा प्रामाणिक राहून त्यांच्या वाट्याला कायम दडपण भीती टेन्शनच पतीचं. या काळजीतून अनेक आजारांवर औषध उपचार त्या घेत होत्या.

आता इथे मन सुद्धा आहे पण परिस्थिती कशी आहे आमच्या सोसायटीमध्ये स्नेहलचे बाबा खूप कडक शिस्तीचे. चार चौघात मुलांना मिसळू द्यायचे नाहीत. पण बालपणी मुले एकमेकांत जाणारच. मुलेच ती! एके दिवशी बाबा कामावर केल्यावर लपून-छपून गेली खेळायला आणि हेमाने तिला जोरात ढकलले. हातच मोडला उजवा खेळता खेळता मनूचा. घरच्यांची भंबेरी उडाली. बाबांना ऑफिसात कळवावे लागले. हात मोडला होता कामच वाढले म्हणायचे, बिचारी मनू! प्रतीक्षा आणि रमेशचा चांगला संसार सुरू होता. दोन मुलं शाळेत जात होती. अचानक एके दिवशी मिल बंद होऊन रमेशचं काम बंद पडलं. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न त्याच्यापुढे आला. हाताला काम नाही. त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. आर्थिक चणचण वाढली. चार तोंड खाणारी, महागाई या अतिविचाराने त्रस्त रमेशने नैराश्य अवस्थेत त्यांनी चक्क रेल्वे रुळावर आत्महत्या केली. प्रतीक्षाच्या संसाराला दृष्टच लागली. मन खंबीर करायला सोबत लागते, सहवास बहरतो, नाते बहरते नाही, तर मनातले संवाद साधले गेले नाहीत, तर दडपणाने ओझं वाटू लागतं. आणि म्हणून जीवन संपवावे लागले बिचारा रमेश… लग्नाला २०-२२ वर्षे झाली. रेखा नि वसंत आजही प्रेमाने भांडतात. भांडण संपली नाहीत. दोन मुलं झाले. नातवंड आली. पण तरीही यांच्या घरात कधी शांतता नसते. सततची भांडणे आदळआपट. एकमेंकास समजून न घेणं! एकाचा स्वभाव उधळपट्टी, तर दुसऱ्याचा काटकसरी. अगदी वयाची साठी उलटत आली तरी रेखा आणि वसंत दोघांची भांडण पाचवीला पूजलेली. मग गुण मिलन करायचे की, मनोमिलन करायचे आणि ते कशाप्रकारे हे सुद्धा काही आजकाल समजत नाही. मन फक्त कटूता, द्वेष, मत्सर, स्पर्धा, हेवे दावे यातच गुंतलेले असते. मानसिक शांतीसाठी पर्याय शोधावे लागतात मग योग, शिबिरे, उपचार, ध्यानधारणा किंवा एखादा ग्रुप वगैरे जॉईन करावा लागतो. घरात शांती नाही म्हणून बाहेर जायचं… किती गृहिणींना आपल्या स्वप्नांवर पाणी ओतावे लागते.

लग्नानंतर शिकू मग, मुलं झाल्यानंतर, मुलं मोठी झाल्यानंतर शिकू पण त्यांना काही शिक्षण आणि नोकरीचा योग नसतो. आणि मग नवऱ्याकडे हात पसरावे लागतात. अशाही काही सुगृहिणी, कष्टाळू असून देखील आपल्या परिश्रमाचे नंदनवन फुलवू शकत नाहीत. त्या कोमेजून जातात. त्यात त्यांचा काही दोष नसतो. दोष असतो तो परिस्थितीचा! कधीच वेळ न मिळाल्याचा! स्वतःला समजून घेण्याचा. कधीतरी स्वतःवर प्रेम करा. स्वतःला वेळ द्या आणि स्वतःला छंद, कल्पना, कृती यातून आपल्या अस्तित्व निर्माण करा. आमच्या सोसायटीतील लीला घरातल्यांच्या हातची कळसुत्री बाहुली झाली होती. लीलाने लग्नच केले नाही. पहिली आई-वडिलांची सेवा केली. आई-वडील गेले. मग भावंडाची सेवा लग्न आणि आता त्यांची मुलं मोठी केली. भावाच्या पत्नीला म्हणजे वहिनीला कॅन्सर झाला. तिचं करता करता लीला म्हातारी झाली. वहिनी कॅन्सरमध्ये मृत्यू पावली. पण लीलाची जबाबदारी मरेस्तोवर तशीच राहिली. आयुष्य ज्या घरासाठी घालवलं ते घर तर परक्याचच होतं. ना जरी माहेर असलं तरी ही खंत तिला कायम बोचत होतीच. अजयला कायम आपली सुंदर गोरीपान बायको सोडून इतरांच्या बायका बघण्याचा शौक होता. आयुष्यभर इतरांच्या बायकोकडे बघणारा अजय पटकन जमिनीवर आला एकदा त्याच्या मित्राने अजयच्या बायकोच्या गुणांचे कौतुक केलं म्हणून त्यांनी आत्मचिंतन केलं आपण कुठे चुकत आहोत हे त्याला कळलं आणि सुधारणा केली. आज आपण पाहिलं मानसिक स्वभावाच्या छटा आणि परिस्थितीने केलेली शिकार यातून माणूस या चक्रव्यूहात फसत असतो. कधी कधी तर आपला काही दोष नसताना देखील जन्माला आलोय, आयुष्य जगावच लागतं. वाट नेईल तिकडे चालावच लागतं. वळण येईल तसं वळावच लागतं. यही है जीवन.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -