

विकसित भारताच्या स्वप्नासाठी योगदान द्यावे- अमित शाह
पुणे : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना ...
प्रस्ताव स्वरुपात सादर झालेल्या प्रकल्पानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ येथून उन्नत जलद हार्बर सेवेचे नियोजन होते. सध्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास योजनेशी संबंधित कामं सुरू आहेत. यामुळे उन्नत मार्गाचे आणि त्यासाठीच्या स्थानकाचे बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे सध्या हा प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे मत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे स्वप्नातली जलद हार्बर सेवा आता स्वप्नातच राहण्याची शक्यता आहे.