
नागपूर : गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) या आजाराचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एकीकडे पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढत असतानाच आता राज्यातील विविध भागांमध्येही या आजाराचा प्रभाव पाहायला मिळत आहे. पुणे कोल्हापूरनंतर आता नागपूरमध्ये जीबीएसचा तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. (GBS)

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दादर रेल्वे स्थानकाजवळील एका गेस्ट हाऊसवर धाड टाकून जहांगीर शेख आणि सेनुअल शेख या दोघांना अटक केली. या आरोपींकडून ...
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या नागपूरच्या जीएमसी रुग्णालयात एक लहान मूल आणि दोन प्रौढ रुग्ण उपचार घेत आहेत. या वर्षातील जीबीएसमुळे मेडिकलमधील हा तिसरा मृत्यू आहे. मृत रुग्ण हा मध्यप्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृती अचानक खालावल्याने त्याला काही दिवसांपूर्वी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाही त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.
त्याचबरोबर दुसरीकडे, सांगली शासकीय रुग्णालय सांगली येथे ३६ वर्षे तरुणाचा जी बी एस या आजाराने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील हा पहिला रुग्ण असून आहे. हा ३६ वर्षीय युवक खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता त्यानंतर शासकीय रुग्णालय सांगली येथे उपचार घेत असताना आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील हा रुग्ण असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. (GBS)