Wednesday, May 21, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Electricity Bill Hike : सर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक!

Electricity Bill Hike : सर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक!

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात खाद्यतेल, कडधान्ये, भाजीपाला, साबण यासारख्या गरजेपयोगी गोष्टींच्या किंमतीत वाढ होत आहे. तर काही दिवसांपूर्वी सर्वसामान्यांच्या प्रवासदरम्यान पसंतीस असणारी एसटीच्या तिकीट दरातही वाढ करण्यात आली. त्यानंतर रिक्षा आणि टॅक्सी प्रवासातही दरवाढ लागू करण्यात आली. सातत्याने वाढत असणाऱ्या या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. यामध्ये आता वीज दरवाढीचा शॉक देखील लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. (Electricity Bill Hike)



महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे (Maharashtra State Electricity Regulatory Commission) वीज दर निश्चितीच्या प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्यक्षात फिक्स चार्ज (स्थिर आकार) १२ ते १५ टक्क्यांनी वाढवला असून व्हेरिएबल चार्ज वाढवणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, दोन्हीपैकी एक दर जरी वाढले तरी वाढीव वीज बिलाचे पैसे ग्राहकांच्याच खिशातून जाणार आहेत. एकंदरित संपूर्ण बेरीज-वजाबाकी केली तर ग्राहकांना ५ ते १० टक्के वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. याबाबत मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईमधील सिडको भवनमध्ये सुनावणी होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर महावितरणाकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका मिळणार आहे. (Electricity Bill Hike)

Comments
Add Comment