
ठाणे : पी.एम. किसान योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते तीन या वेळेत १९व्या हफ्त्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
बिहार राज्यातील भागलपूर येथे किसान सन्मान समारोह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या ऑनलाईन समारंभामध्ये सर्व खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.
प्रगतीशील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

आता कोणत्याही क्षणी होणार आदित्य ठाकरेंना अटक; ठाकरे गटातील माजी नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian death case) ...
मंत्री (कृषी), महाराष्ट्र राज्य यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभाग, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.