Saturday, June 28, 2025

नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्यावरील कारवाईवरुन तणाव, मुसलमानांचा कारवाईला विरोध

नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्यावरील कारवाईवरुन तणाव, मुसलमानांचा कारवाईला विरोध
नाशिक : नाशिक - पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली. या कारवाईला विरोध करण्यासाठी सरसावलेल्या मुसलमानांना बघून हिंदू नागरिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला. अनधिकृत दर्गा हटवलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी हिंदूंनी केली. तणाव निर्माण होत असल्याचे बघून पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. कायदा - सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी काठे गल्ली परिसरात जमावबंदी लागू केली आहे. बॅरिकेड्स लावून आणि मोठा फौजफाटा तैनात करुन पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा