Thursday, March 27, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वटाटा सफारीला २७ वर्षे पूर्ण, ‘स्‍टेल्‍थ एडिशन’ लाँच

टाटा सफारीला २७ वर्षे पूर्ण, ‘स्‍टेल्‍थ एडिशन’ लाँच

मुंबई : टाटा मोटर्स ही भारतातील आघाडीची एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनी टाटा सफारीची २७ आयकॉनिक वर्षे साजरी करत आहे. या निमित्ताने कंपनीने ‘स्‍टेल्‍थ एडिशन’ लाँच केली आहे. ही आरामदायी, सुरक्षित, वेगवान, आधुनिक सुखसोयींनी युक्त अशी गाडी आहे. फक्‍त २,७०० युनिट्स असलेली ही प्रीमियम एडिशन हॅरियर व सफारीमध्‍ये उपलब्‍ध असेल. स्‍लीक, मोनोटोन फिनिशसह ही गाडी उपल्ध आहे. बुकिंग नलाईन तसेच कंपनीच्या अधिकृत डीलर्सच्या माध्यमातून सुरू आहे.

नवीन स्‍टेल्‍थ मॅट ब्‍लॅक रंगात उपलब्ध असलेली ही गाडी एसयूव्‍हीच्‍या आकर्षकतेमध्‍ये भर करते. यामधील नॉन-रिफ्लेक्टिव्‍ह पृष्‍ठभाग वेईकलला अत्‍याधुनिक, आकर्षक लूक देते, एसयूव्‍हीच्‍या बॉडी लाइन्‍स व कॉन्‍चर्सना आकर्षक बनवते, ज्‍यामुळे वेईकल प्रीमियम दिसते. सर्वोत्तम शीन प्रखर सूर्यप्रकाशामध्‍ये ग्‍लेअर कमी करते, ज्‍यामधून कोणत्‍याही प्रकाशामध्‍ये वेईकलचा आकर्षक स्‍टान्‍स दिसून येतो. हॅरियर स्‍टेल्‍थसाठी २५.०९ लाख रूपये (एक्स-शोरूम दिल्ली) आणि ६ तसेच ७ सीटर दोन्हीमध्ये उपलब्ध सफारी स्‍टेल्‍थसाठी २५.७४ लाख रूपये (एक्स-शोरूम दिल्ली) किंमत असलेल्‍या या लिमिटेड एडिशन एसयूव्‍हींमध्‍ये प्रतिष्‍ठा, कार्यक्षमता व अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे विनासायास एकत्रिकरण आहे, ज्‍यामुळे या एसयूव्‍ही सर्वोत्तमतेच्‍या अद्वितीय प्रतीक आहेत.

नवीन किया सिरॉस लाँच

हॅरियर व सफारीचे हे उत्‍साहवर्धक नवीन एडिशन लाँच करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर वि‍वेक श्रीवत्‍स म्‍हणाले, “टाटा मोटर्स दीर्घकाळपासून भारतातील एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये अग्रस्‍थानी आहे, जेथे कंपनीच्‍या डीएनएमध्‍ये नाविन्‍यता रूजलेली आहे. भारतातील बाजारपेठेत लाईफस्‍टाईल एसयूव्‍हीची संकल्‍पना सादर केलेल्‍या टाटा सफारीमधून अग्रगण्‍य सर्वोत्तमतेचा हा उत्‍साह दिसून येतो. अद्वितीय वारसाच्‍या २७ वर्षांसह टाटा सफारी सतत विकसित झाली आहे आणि लाँच करण्‍यात आलेली स्‍टेल्‍थ एडिशन या वारसाला मानवंदना आहे. ही स्‍पेशल एडिशन प्रीमियम, एक्‍सक्‍लुसिव्‍ह असून अद्वितीय स्‍टील्‍थ मॅट ब्‍लॅक फिनिशचे फक्‍त २,७०० युनिट्स उपलब्‍ध आहेत. स्‍टेल्‍थ एडिशन एसयूव्‍हीपेक्षा अधिक असून प्रतिष्‍ठा, साहस व क्षमतेचे प्रतीक आहे, जी महत्त्वाकांक्षी संग्रहकाच्‍या कारमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करेल आणि उत्‍साही व जाणकारांना आवडेल. स्‍टेल्‍थ एडिशनचे मालक बनणे म्‍हणजे अपवादात्‍मक कार खरेदी करण्‍यासोबत ऑटोमोटिव्‍ह वारसाचा भाग बनण्‍यासारखे आहे, जेथे प्रत्‍येकजण त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या कारचे कौतुक करतील.”

ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स भारतात लाँच

टाटा हॅरियर आणि सफारी स्‍टेल्‍थ एडिशनची वैशिष्ट्ये:

दिग्‍गज लँड रोव्‍हर डी८ प्‍लॅटफॉर्ममधून संचालित शक्तिशाली ओएमईजीएआरसी प्‍लॅटफॉर्मवर डिझाइन करण्‍यात आलेल्‍या हॅरियर व सफारी स्‍टेल्‍थ एडिशनमध्‍ये डिझाइन, कार्यक्षमता आणि प्रगत तंत्रज्ञानाचे लक्षवेधक संयोजन आहे. या वेईकलमधील विशेष स्‍टील्‍थ मॅट ब्‍लॅक फिनिश, आर१९ ब्‍लॅक अलॉई व्‍हील्‍स आणि स्‍टेल्‍थ मॅस्‍कट वेईकलची आकर्षकता व लक्षवेधक उपस्थितीमध्‍ये अधिक भर करतात. आतील बाजूस कार्बन-नॉईर थीममधील (सफारीमध्‍ये फक्‍त दुसऱ्या रांगेत) पहिल्‍या व दुसऱ्या रांगेत हवेशीर सीट्स, वॉईस-असिस्‍टेड ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल सिस्‍टम आहे, ज्‍यामधून प्रीमियम आरामदायीपणाची खात्री मिळते. तंत्रज्ञानाला अधिक प्राधान्‍य देण्‍यात आले आहे, जेथे ३१.२४ सेमी हार्मन टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम, मनोरंजनासाठी अर्केड अॅप स्‍टोअर, रिमोट कनेक्‍टसाठी अॅलेक्‍सा होम २ कार, नेव्हिगेशनसाठी इनबिल्‍ट मॅय माय इंडिया, २६.०३ सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्‍लस्‍टर आणि सर्वोत्तम जेबीएल १०-स्‍पीकर ऑडिओ सिस्‍टमसह हार्मन ऑडिओवॉरएक्‍स, स्‍लायडिंग आर्म-रेस्‍ट व स्प्रिंकलर नोजल अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. या एडिशनमध्‍ये क्रियोटेक २.० लिटर बीएस-६ फेज २ टर्बोचार्ज्‍ड इंजिन आहे, जे उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभवासाठी ६-स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशनच्‍या माध्‍यमातून १७० पीएस शक्‍ती देते. सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देत स्‍टेल्‍थ एडिशनमध्‍ये लेव्‍हल २+ एडीएएससह २१ कार्यक्षमता, तसेच इंटेलिजण्‍ट स्‍पीड असिस्‍ट फिचर (फर्स्‍ट टाइम इन सेगमेंट), ७ एअरबॅग्‍ज आणि ईएसपीसह १७ सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे ही तिच्‍या श्रेणीमधील सर्वात सुरक्षित एसयूव्‍ही आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -