नवी दिल्ली : विमान प्रवासात वेळेची बचत होते, प्रवास आरामदायी आणि सुखकारक होतो यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्या वाढू लागली आहे. नुकताच केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एअर इंडियामधून विमान प्रवास केला. त्यांनी हा प्रवास एअर इंडियाच्या एआय ४३६ विमानातून भोपाळ ते दिल्ली असा प्रवास केला. या प्रवासाकरिता त्यांनी एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट काढले होते. पण त्यांना विमानात मोडक्या खुर्चीवर बसावे लागले. संपूर्ण प्रवास केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोडक्या खुर्चीत बसून केला. या घटनेबाबत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक एक्स पोस्ट केली. त्यांनी पोस्टद्वारे मोडक्या खुर्चीबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाकडे नाराजी व्यक्त केली.
आज मुझे भोपाल से दिल्ली आना था, पूसा में किसान मेले का उद्घाटन, कुरुक्षेत्र में प्राकृतिक खेती मिशन की बैठक और चंडीगढ़ में किसान संगठन के माननीय प्रतिनिधियों से चर्चा करनी है।
मैंने एयर इंडिया की फ्लाइट क्रमांक AI436 में टिकिट करवाया था, मुझे सीट क्रमांक 8C आवंटित हुई। मैं जाकर…
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 22, 2025
शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार,ते विमानात तिकिटावर नमूद खुर्चीवर बसण्यासाठी गेले. त्यावेळी खुर्ची मोडकी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खुर्ची सदोष असल्याची माहिती वरिष्ठांना कळवली होती. पण वरिष्ठांनी त्या माहितीकडे दुर्लक्ष केले. यामुळे तिकीट विक्रीच्या वेळी मोडक्या खुर्चीची जागा पण विक्रीसाठी उपलब्ध होती. नेमके त्याच आसनाचे तिकीट खरेदी केल्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर मोडक्या खुर्चीतून प्रवास करण्याची वेळ आली. विमानाच्या तिकिटाचे पैसे मोजूनही मोडकी खुर्ची मिळाल्याबाबत कृषीमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कंपनीचे व्यवस्थापन टाटा समुहाकडे आहे. यामुळे कारभार सुधारला असेल, अशी आशा होती. पण तसे झाले नसल्याचे ताज्या घटनेवरुन दिसते, अशी पोस्ट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची पोस्ट बघताच एअर इंडियाच्या सोशल मिडिया टीमने त्यांना तातडीने रिप्लाय केला. झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली तसेच विमानांतील सदोष आसने बदलण्याचे काम तातडीने हाती घेतल्याचे जाहीर केले.