Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र समृद्ध बनावा : खासदार नारायण राणे

महाराष्ट्र समृद्ध बनावा : खासदार नारायण राणे

आई भराडी देवी भाविकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार: मंत्री नितेश राणे

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, सौ. नीलम राणे यांनी घेतले आई भराडी देवीचे आशीर्वाद

मसुरे : आंगणेवाडी येथे आई भराडी देवीचे जत्रोत्सवाच्या दिवशी शनिवारी दुपारी१२ च्या सुमारास माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, (Narayan Rane) पालकमंत्री नितेश राणे, सौ. नीलम राणे यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी भाविकांना उद्देशून बोलताना खासदार नारायण राणे म्हणाले, गेली ३२ वर्ष मी आई भराडी देवीच्या दर्शनासाठी येत आहे. देवीकडे मागण्यासारखें काही राहिलेले नाही. न मागता सुद्धा देवीने राणे कुटुंबाना सर्व दिले आहे. यासाठी आम्ही देवीचे ऋणी आहोत. महाराष्ट्र समृद्ध बनावा यासह मुख्यमंत्री,पालकमंत्री यांच्या हातून राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मातेने आशीर्वाद द्यावे. जत्रोत्सवासाठी आंगणे कुटुंबियांच्या साथीने पालकमंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे यांनी व्यवस्था केली आहे. स्थानिक ग्रामस्थांना दीर्घ आयुष्य मिळूदे. देवीने सर्वांच्या इच्छा पूर्ण कराव्यात असेही शेवटी खासदार नारायण राणे म्हणाले.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले,आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीचा सर्व भक्तांवर कृपा आशीर्वाद आहे. या कृपाशीर्वादामुळे सर्व यशस्वी होत आहेत. आईच्या चरणी लीन होणाऱ्या प्रत्येक भक्ताला चांगले आरोग्य आणि सुख समृद्धी लाभू दे. नवसाला पावणारी आई भराडी देवी सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले,२०२४ या वर्षात भाजप, महायुती आणि राणे कुटुंबाला देवीने भरभरून आशीर्वाद दिले. राज्याची व जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. स्थानिक आमदार निलेश राणे, पालकमंत्री म्हणून मी स्वतः व खासदार नारायण राणे यांनी या जत्रोत्सवात भावी भक्तांना गैरसोय होऊ नये यासाठी नियोजनामध्ये प्रशासन व सरकार सोबत बारकाईने लक्ष दिले आहे. मी स्वतः व आमदार निलेश राणे व प्रशासनाचे प्रमुख ही जत्रा सुरळीत व्हावी यासाठी कार्यरत आहोत. त्यामुळे मी प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो. आंगणेवाडी मध्ये येताना राजकीय जोडे घालून येऊ नये. मंडळाने सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.

देवीच्या समोर सगळे सारखे आहेत. कोणी लहान अथवा मोठा नाही. खासदार नारायण राणे यांनी या भागातील रस्ते, वीज, पाणी या सगळ्या सोयी सुविधा पुरविल्या आहेत. बाकीचे भाषण करायला येतात आम्ही सेवा करायला येतो. येणाऱ्या वर्षी भाविकांना झालेला त्रास पुढील वर्षी नाही होणार अशी मी ग्वाही देतो. भाविक भक्तांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन म्हणून कुठे कमी पडणार नाही असे प्रयत्न असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले.

यावेळी आंगणे कुटुंबीयांच्या वतीने खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -