अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

श्रीगोंदा : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी २३ वर्षीय ऋषीकेश भिमराव उर्फ वाळुंजकर वय २३ रा. जवळके ता.जामखेड जि अहमदनगर या आरोपीला भा.द.वि. ३७६ (२) (एन) अन्वये जन्मठेपेची शिक्षा, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कारावासाची शिक्षा तसेच लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ६ अन्वये जन्मठेपेची शिक्षा, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकिल पुष्पा कापसे गायके यांनी पाहिले.


अल्पवयीन पिडीत मुलगी दि.०८ जानेवारी २०२४ रोजी शाळेत जात असताना आरोपी ऋषीकेश भिमराव वाळुंजकर याने पीडित मुलीला शाळेत सोडवितो असे सांगत सोबत आणलेल्या चारचाकी गाडीत बसण्यास सांगितले. त्या वेळी पिडीत मुलीने गाडीत बसण्यास नकार दिल्याने आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देत पिडीत अल्पवयीन मुलीला बळजबरीने गाडीमध्ये बसवुन नान्नज येथील बंद ढाब्यावर घेवुन गेला व तिचेवर लैंगिक आत्याचार केला. त्या नंतर दि. २९ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा आरोपी हा पिडीतेला घेवुन बंद ढाब्यावर जात तिचेवर आत्याचार केला. त्यानंतर देखील २० फेब्रुवारी २४ रोजी आरोपी पुन्हा पिडीतेला नान्नज येथील जंगलामध्ये घेवुन गेला व तिच्यावर आत्याचार केला. त्यानंतर १० मार्च २४ रोजी


आरोपी हा रात्रीच्या वेळी तिच्या घरामागे आला व पुन्हा आरोपीने तिच्यावर आत्याचार केला.तसेच ही गोष्ट जर कोणाला सांगितली तर तुला व तुझे वडिलांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर वरिल घटना पिडीतने आई वडिलास सांगितल्याने पीडित मुलीच्या आईने खर्डा पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गु.र.न. ५३/२०२४ नुसार लैंगिक  अपराधांपासून बालकांचे संरक्षणस अधि नियम २०१२ (POCSO) व भा.द.वि. कलम ३७६, ५०६ अन्वेय गुन्हा नोंदविला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.


सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश-१ मुजीब एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडिता, वैद्यकीय अधिकरी, तपासी अधिकारी, न्याय वैदीकीय प्रयोग शाळेतील साक्षीदार व ग्रामसेवक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील पुष्पा कापसे/गायके यांनी काम पाहिले. मा. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकील पुष्पा कापसे/ गायके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी नामदेव रोहखले तसेच महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल आशा खामकर व फिर्यादी तर्फे ॲड. पाटील यांनी सहकार्य केले.

Comments
Add Comment

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित

अरेरे! १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैष्णोदेवी यात्रेला पुन्हा लागला ब्रेक

जम्मू काश्मीर: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा एकदा पुढील आदेश येईपर्यंत

आरोहच्या अंतर्मनातील महापूर

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल रेगे चित्रपटाने प्रसिद्धीस आलेला कलाकार म्हणजे आरोह वेलणकर. महापूर नावाचं नाटक तो

itel A90 लिमिटेड एडिशन लाँच मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनसह ७००० रूपयांत लाँच

MIL STD 810H - सह मिलिटरी-ग्रेड टफनेस आणि धूळ, पाणी आणि थेंब प्रतिरोधकतेचे 3P कंपनीकडून आश्वासन परवडणाऱ्या किमतीत

आधी वंदू तुज मोरया...

महाराष्ट्रात आणि देशातही घराघरांत पोहोचलेला आणि आबालवृद्धांचा आराध्य दैवत गणेशोत्सवाची सुरुवात आजपासून