Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्रडोक्यात वार करून मावस भावजयचा खून

डोक्यात वार करून मावस भावजयचा खून

अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अकोले : दारूच्या नशेत भावजय बरोबर रात्रीच्या सुमारास किरकोळ भांडणाच्या कारणावरुन अनकुचीदार व टनक हत्याराने डोक्यावर तोडांवर, अंगावर मारहाण करून खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथे घडली असुन अकोले पोलिसांनी तात्काळ आरोपी राजु शंकर कातोरे यास ताब्यात घेतले आहे.

याबाबत अकोले पोलिसांत मयत जिजाबाई शिवराम खोडके याचा मुलगा सुनिल शिवराम खोडके (वय२४,)ह.रा.उंचखडक बु ता अकोले याने फिर्याद दिली असुन यानुसार फिर्यादी व त्याची आई जिजाबाई शिवराम खोडके व चुलते राजु शंकर कातोरे हे बोरीचीवाडी, गर्दणी येथील मुळ राहणार असुन सद्या ते भाऊसाहेब आनंदा देशमुख रा.उंचखडक बु याची शेती वाट्याने करत असुन त्याचेच शेडमध्ये उंचखडक बु येथे एकत्र राहत आहेत.

चुलता राजु शंकर कातोरे याची पत्नी पळून गेलेली असुन त्याला दारूचे व्यसन आहे तो आईकडे नेहमी दारूला पैसे मागतो नाही दिले तर आईला मारहाणही करत असे.काल दि. २०/०२/२०२५ रोजी रात्री १० च्या सुमारास राहत असलेल्या शेडमध्ये फिर्यादीची आई जिजाबाई शिवराम खोडके असताना फिर्यादीचा चुलता आरोपी राजु शंकर कातोरे याने दारूच्या नशेत किरकोळ भांडणाच्या कारणावरून अनकुचीदार व टनक हत्याराने आईच्या डोक्यावर तोडांवर, अंगावर मारहाण करून खून केला असल्याची फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत गुरनं -६२/२०२५ भरतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पो. निरिक्षक मोहन बोरसे यांनी घटनास्थळी जावुन पाहणी करुन पथक तयार केले व पळून जाण्याचे तयारीत असलेला आरोपी राजु शंकर कातोरे यास पो.नी बोरसे यांच्या मार्गदर्शनाखालील पो.हे.कॅा.हुसेन शेख,पो.कॅा.अविनाश गोडगे, पो.ना.मोरे व पोलिस मित्र आकाश पांडे यांचे पथकाने अकोले शहरातून ताब्यात घेतले आहे. तर पो.नी.बोरसे यांनी वरिष्ठ उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांना घटनेची माहिती कळवुन गुन्हा दाखल करत मयताचे शव शवविच्छेदन प्रवरा रुग्णालय लोणी येथे पाठवण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -