Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीNilesh Rane : सर्वकाही आई भराडीमुळे मिळाले :आमदार निलेश राणे

Nilesh Rane : सर्वकाही आई भराडीमुळे मिळाले :आमदार निलेश राणे

उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे यांनी घेतले आई भराडी देवीचे दर्शन

मसूरे : आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह शनिवारी दुपारनंतर आई भराडीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

यावेळी आंगणे कुटुंबीयांचे स्वागत स्वीकारल्यानंतर बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, राणे कुटुंबाला सर्वकाही आई भराडी मुळे मिळाले आहे. आई भराडीच्या आशीर्वादामुळे राजकारणात विविध पदे मला मिळाली आहेत.

Electricity Bill Hike : सर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक!

पालकमंत्री नितेश राणे आणि मी आंगणे कुटुंबीयांच्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी अगदी १०० टक्के प्रयत्न करू. या भागातील भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या दीड किलोमीटर वरून पाणी आणून दूर केली जाईल. तसेच येथील मोबाईल टॉवरचा प्रश्न सुद्धा दूर केला जाईल. यात्रा यशस्वीतेसाठी आंगणे कुटुंबीयांच्या मेहनतीला मानाचा मुजरा करतो. येथील भाविक भक्तांना सोयीसुविधा जास्तीत जास्त कशा पुरवता येतील यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे आमदार निलेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -