उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे यांनी घेतले आई भराडी देवीचे दर्शन
मसूरे : आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह शनिवारी दुपारनंतर आई भराडीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
यावेळी आंगणे कुटुंबीयांचे स्वागत स्वीकारल्यानंतर बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, राणे कुटुंबाला सर्वकाही आई भराडी मुळे मिळाले आहे. आई भराडीच्या आशीर्वादामुळे राजकारणात विविध पदे मला मिळाली आहेत.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात खाद्यतेल, कडधान्ये, भाजीपाला, साबण यासारख्या गरजेपयोगी गोष्टींच्या किंमतीत वाढ होत आहे. तर काही ...
पालकमंत्री नितेश राणे आणि मी आंगणे कुटुंबीयांच्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी अगदी १०० टक्के प्रयत्न करू. या भागातील भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या दीड किलोमीटर वरून पाणी आणून दूर केली जाईल. तसेच येथील मोबाईल टॉवरचा प्रश्न सुद्धा दूर केला जाईल. यात्रा यशस्वीतेसाठी आंगणे कुटुंबीयांच्या मेहनतीला मानाचा मुजरा करतो. येथील भाविक भक्तांना सोयीसुविधा जास्तीत जास्त कशा पुरवता येतील यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे आमदार निलेश राणे म्हणाले.






