Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीGBS Patient : सांगली जिल्ह्यात 'जीबीएस'चा पहिला बळी

GBS Patient : सांगली जिल्ह्यात ‘जीबीएस’चा पहिला बळी

सांगली : सांगलीतील महापालिका क्षेत्रात गुईलेन बॅरी सिंड्रोम रुग्णाचा मृत्यू झाला.येथील खणभागातील ३६ वर्षीय तरुणाला गेल्या आठवड्यात उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर आता मनपा आरोग्य विभागाकडून खणभागात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारीला खणभाग येथील एका तरुणाच्या हाता-पायाचे स्नायू कमकुवत झाल्याने अशक्तपणा आला होता. त्यामुळे त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १९ रोजी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याला जीबीएसची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. उपचार सुरू असताना त्याचा शुक्रवारी (ता. २१) मृत्यू झाला. दरम्यान, मिरज शासकीय रुग्णालयात यापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्ती या परजिल्ह्यातील होत्या. त्यामुळे सांगलीतील हा पहिला बळी ठरला आहे.आरोग्य विभागाने खणभागात सर्वेक्षणाची एक फेरी पूर्ण केली आहे. नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली.

Farah Khan : होळीला “छपरींचा सण” म्हणल्याने फराह खान विरोधात गुन्हा दाखल

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात जीबीएसने थैमान घातले आहे. काहींना प्राणदेखील गमवावे लागले आहेत. सांगलीत देखील जीबीएसचे रुग्ण आढळून येत आहेत. २८ जानेवारीला चिंतामणीनगर येथे जीबीएसचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर विश्रामबाग, संजयनगरमध्येदेखील रुग्ण आढळून आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -