मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा सिनेमातील गणोजी शिर्के यांच्याबाबतच्या माहितीवर शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. इतिहासाची तोडमोड करुन हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप गणोजी शिर्केंच्या वंशजांनी केला आहे. आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हा कट असल्याचे दीपक शिर्के यांनी केला आहे. त्यांच्या आक्षेपानंतर आता छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी त्यांची माफी मागितली आहे.
छावा सिनेमा गणोजी शिर्के यांना जाणीवपूर्वक फितूर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे खुद्द गणोजी शिर्केंचे आणि आत्ताच्या त्यांच्या वंशजांची बदनामी केली गेली आहे, त्यामुळे चित्रपटातून हा प्रसंग वगळण्यात यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा शिर्केंचे वंशज दिपक शिर्के यांनी दिला आहे. पुण्यात शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला आक्षेप नोंदवला.
पुस्तकातील माहितीत बदल केलाच नाही
दरम्यान, या आक्षेपानंतर आता दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी याप्रकरणी शिर्के कुटुंबाची माफी मागितली आहे. तसंच हा प्रसंग का दाखवला? याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीवरील फोनवरील संभाषणात बोलताना उत्तेकर यांनी फोनवरुन भूषण शिर्के यांची माफी मागितली. ते म्हणाले, सॉरी मी काल तुमचा फोन उचलू शकलो नाही. पण मी तुमची कालची पत्रकार परिषद पाहिली आणि तुमचा मेसेजही वाचला. जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो. तसेच मी तुमच्या मेसेजला प्रामाणिकपणे उत्तरही देऊ इच्छितो की, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो, त्यात आम्ही म्हटलेय की हा चित्रपट पूर्णपणे छावा या कादंबरीवर आधारित आहे. त्याप्रमाणेच आम्ही चित्रपटातील प्रसंग रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. पण यातील माहिती जी पुस्तकात आहेत तीच आहे. यात मी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून यात काहीही बदल केलेला नाही.
Farah Khan : होळीला “छपरींचा सण” म्हणल्याने फराह खान विरोधात गुन्हा दाखल
टीव्ही सिरियलमध्येही हेच होते संदर्भ
कादंबरीत गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के हे शिरकाण गावचे, त्यांचे कुलदैवत कुठले? या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. तसंच ही कादंबरी अजुनही बाजारात उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांवर टीव्हीवर एक सिरियल आली होती, त्यातही हेच सर्व संदर्भ होते. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की, या चित्रपटात मी त्यांचे नावही घेतलेले नाही. त्यांचे गावही दाखवलेले नाही. या चित्रपटात आम्ही केवळ गणोजी आणि कान्होजी या केवळ एकल नवानेच त्यांचा उल्लेख केला आहे, असेही छावाचे दिग्दर्शक लक्ष्ण उत्तेकर यांनी स्पष्ट केले आहे.