Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Shaktikanta Das : शक्तिकांता दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

Shaktikanta Das : शक्तिकांता दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे काही दिवसांपूर्वीच सेवानिवृत्त झाले. अशातच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. माजी आरबीआय गर्व्हनर शक्तिकांता दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळासोबतच संपणार.

तत्पूर्वी शंक्तिकांता दास यांनी डिसेंबर २०१८ मध्ये त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आणि त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०१४ रोजी संपला होता. त्यानंतर त्यांची ही नियुक्ती करण्यात आली.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पंतप्रधानांचे प्रधान सचिव-२ म्हणून श्री शक्तिकांता दास, आयएएस (निवृत्त) (तामिळनाडू:१९८०) यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. ही नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून प्रभावी होईल. त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळासह किंवा पुढील आदेशापर्यंत, जे आधी असेल ते संपणार आहे.

दास यांच्या नियुक्तीनंतर राजकीय आणि आर्थिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये मोठे बदल होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख असल्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >