ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात दोन महिन्यांत १४९ आगींच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश आगीच्या घटना तांत्रिक कारणांमुळे लागल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याने आग लागत असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा या शहरांचा समावेश होतो. या क्षेत्रांमध्ये लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिकेचे अग्निशमन केंद्र आहे. यात आठ अग्निशमन केंद्रे असून ९८ अग्निशामक वाहने आहेत. असे असले तरी शहरात विविध कारणांमुळे आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. १ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रात १४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. या आकडेवारीनुसार महिन्यातील दिवसांपेक्षा आगीच्या घटना सर्वाधिक घडत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ७३ तर फेब्रुवारी मध्ये ८० आगीच्या घटना घडल्या होत्या.
मागील वर्षीच्या तुलनेत २०२५ या नवीन वर्षात आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार, तांत्रिक कारणे, गॅस गळती आणि ज्वलनशील पदार्थांच्या चुकीच्या हाताळणीमुळे आगीची प्रकरणे समोर आली आहेत. ठाणे शहरात मागील काही वर्षांपासून मोठमोठी गृहसंकुले, हॉटेल, बिझनेस हब यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वीजेचा वापर देखील वाढला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून ठाण्याचे तापमान हे वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विजेचा वापरही अधिक प्रमाणात होऊ लागल्याने उपकरणांमधील बिघाडांमुळे या आगी लागत आहेत. तर शहरातील मुंब्रा, वागळे या दोन्ही परिसरात एच पी गॅस सिलिंडर गळती झाल्याने आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वेळच्या वेळी देखभाल आणि विजेची उपकरणे दुरुस्त करणे गरजेचे आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…