नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावच्या दरेगावजवळ ट्रक रिक्षावर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकखाली रिक्षा दाबली गेल्यामुळे त्यातील रिक्षा चालकासह दोन कॉलेज विद्यार्थ्यांनीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन विद्यार्थीनी आणि ट्रक मधील दोन असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालेगावच्या दरेगावजवळ मुंबई आग्रा महामार्गावर रिक्षा चालक नेहमी प्रमाणे चार विद्यार्थिनीना कॉलेजमध्ये घेऊन जात असताना विरुद्ध दिशेने जाणारा ट्रक रिक्षावर पलटी झाला.
मुंबई : मुंबई- नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट पुढील ६ दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मुंबई - नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता ...
अपघात इतका भीषण होता की या अपघातात रिक्षा आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन रिक्षाचा अक्षरशः चुरा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले व जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवले.






