मुंबई: WhatsApp जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मने केवळ ३० दिवसांत ८४ लाख अकाऊंट्स बंद केले आहेत.
हे पाऊस WhatsAppची पॅरेंट कंपनी मेटाने उचलले आहे. या अकाऊंट्सला स्कॅम, मिस इन्फॉर्मेशन आणि गैरकायदेशीर अॅक्टिव्हिटीसाठी बंद केले आहे. खरंतर, भारतीय आयटी नियमांच्या पालनासाटी कंपन्या दर महिन्याला अशी कारवाई करतात. WhatsApp भारतात एक महत्त्वाचा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.
या प्लॅटफॉर्मचा लोक चुकीचा वापरही करतात. असे अकाऊंट्स जे स्कॅम, चुकीची माहिती अथवा गैरकायदेशीर पद्धतीने काम करतात त्यांना कंपनी ब्लॉक करते.
मेटाच्या नुकत्याच रिपोर्टनुसार कंपनीने १ ऑगस्टपासून ते ३१ ऑगस्टदरम्यान WhatsAppने ८४.५ लाख अकाऊंट्स बंद केले आहेत. हे सर्व अकाऊंट्स भारतीय आहेत. नियांचे उल्लंघन केल्या १६.६ लाख अकाऊंट्स बंद करण्यात आले आहेत. कंपनीने १६ लाख अकाऊंट्स आपल्या कारवाईतंर्गत बंद केलेत.