Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

Vastu tips: घरातील आनंद हिरावून घेतात या ३ गोष्टी, कुटुंब होते कंगाल

Vastu tips: घरातील आनंद हिरावून घेतात या ३ गोष्टी, कुटुंब होते कंगाल
मुंबई: वास्तुशास्त्रात घराचा आनंद आणि सुख-संपन्नतेसाठी काही सरळ सोपे नियम सांगितले आहेत. प्रत्येक घरात नियमांचे पालन केले गेले पाहिजे. वास्तुशास्त्रात अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे घरातील प्रगतीला ग्रहण लागते. तसेच संपूर्ण कुटुंब कंगाल होते.

गंजलेल्या गोष्टी

वास्तुनुसार घरात गंजलेल्या गोष्टी अजिबात ठेवू नयेत. घरात गंज लागलेल्या गोष्टी ठेवल्याने मनुष्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो. गंजलेले लोखंड, खिडकी, दरवाजा, टाळे या कोणत्याही गोष्टी लगेचच बाहेर टाका. या गोष्टी कुंडलीत मंगळची स्थिती बिघडवतात.

खराब झालेली घड्याळ

घरात चुकूनही बंद अथवा खराब झालेले घड्याळ ठेवू नये. खराब घड्याळामुळे घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. या लोकांना केवळ आर्थिक बाबतीतच नुकसान होत नाही तर घरातील माणसांमध्ये वादही वाढतो.

घराच्या छतावर भंगारचे सामान

घराच्या छतावर कधीही भंगारचे सामान ठेवू नये. असे केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा वाढते. यामुळे घरात कंगाली वाढते. सोबतच घरातील सदस्य नेहमी आजारी राहतात. आजारावर सातत्याने पैसा खर्च होतो. घरातील आनंद निघून जातो.
Comments
Add Comment