Sunday, October 26, 2025
Happy Diwali

एकनाथ शिंदेंना मारण्याची धमकी देणारे अटकेत

एकनाथ शिंदेंना मारण्याची धमकी देणारे अटकेत
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई एटीएसने बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे धाड टाकून दोघांना अटक केली. अटक केलेल्यांची नावं अनुक्रमे मंगेश अच्युतराव वायाळ (३५) आणि अभय गजानन शिंगणे (२२) अशी आहेत. या दोघांनी अभय शिंगणेच्या मोबाईलच्या दुकानातून धमकीचा ई-मेल पाठवला. दारुच्या नशेत त्यांनी हे कृत्य केले. आरोपींमध्ये आते-मामे भावाचे नाते आहे.
एटीएसने आरोपींना चौकशीसाठी मुंबईत आणले आहे. धमकी दे ण्याचे कारण, आरोपींचे कोणाशी लागेबांधे आहेत का ? आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ? या सर्व बाबी तपासल्या जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे.
Comments
Add Comment