सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे दर्शन मंडप व स्कायवॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी, यासाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांतून दर्शन मंडप आणि स्कायवॉकचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी तांत्रिक बाबींचा मुद्दा समोर आणण्यात आला आहे.
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर; शनिवारी होणार वाहतुकीत बदल
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीकडून पंढरपूर येथील दर्शन मंडप व स्कायवॉकसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्याआधी जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून २३ सप्टेंबरला मंजुरी मिळाली होती. याबाबत शासन आदेश जारी होऊन स्कायवॉकसाठी टेंडर मागविण्यात आले. त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रियेतील कालावधी कमी केला होता. पुन्हा तांत्रिक मुद्दा समोर आणून दर्शन मंडपाच्या कामाची प्रक्रिया थांबविल्याने भाविकांमधून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.