Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सौरव गांगुलीच्या कारचा दुर्गापूर एक्सप्रेसवे वर अपघात, थोडक्यात बचावला क्रिकेटर

सौरव गांगुलीच्या कारचा दुर्गापूर एक्सप्रेसवे वर अपघात, थोडक्यात बचावला क्रिकेटर

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीच्या कारला गुरूवारी दुर्गापूर एक्सप्रेस वेवर अपघात झाला. सौरव गांगुली एका कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, दंतनपूर जवळ एक ट्रक अचानक त्याच्या ताफ्यासमोर आला. यामुळे ड्रायव्हरला अचानक ब्रेक लावावा लागला. यामुळे मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना आदळला. यातील एक गाडी सौरव गांगुलीच्या कारला आदळली.

दरम्यान, या अपघातात सौरव गांगुली आणि त्याच्या ताफ्यातील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही. मात्र गांगुलीच्या ताफ्यातील दोन गाड्यांना लागले.

या अपघातानंतर सौरव गांगुलीला साधारण १० मिनिटे रस्त्यावर वाट पाहावी लागली. यानंतर तो कार्यक्रमासाठी रवाना झाला आणि युनिर्व्हसिटीतील कार्यक्रमात सहभागी झाला.

सौरव गांगुली भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा माजी अध्यक्ष आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्याची गणती सर्वात आक्रमक आणि प्रभावशाली कर्णधार अशी केली जाते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने परदेशात शानदार कामगिरी केली आणि अनेक ऐतिहासिक विजय मिळवले.

Comments
Add Comment