बाप्पाच्या गावातून पुकारला एल्गार ……. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार …….
पेण(देवा पेरवी): पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयाने घातलेल्या बंदी विरोधात राज्यभरातील गणेश मूर्तीकार आक्रमक झाले आहेत. आज गणेश मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेणमधून एल्गार पुकारण्यात आला. मुंबईसह राज्यातील गणेश मूर्तिकारांच्या संघटनांची बैठक आज पेण इथं पार पडली.
न्यायालयाच्या निर्णया विरोधात लढा देण्याचा निर्धार आजच्या सभेत करण्यात आला. इतर राज्यात पीओपी मूर्तींवर बंदी नाही मग महाराष्ट्रातच का असा सवाल मूर्तिकारानी उपस्थित केलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गाईड लाइन्स आमच्यावर लादल्या गेल्या आहेत.
यासंदर्भातील अहवाल वेळेत न दिल्याने ही वेळ आल्याचा आरोप मूर्तीकारांनी केलाय. सरकारने याबाबत वेळीच योग्य भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.