Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीAncient Shiv Temple : महाशिवरात्री आधीच चमत्कार! देऊरवाडा येथे जमिनीच्या आत सापडले...

Ancient Shiv Temple : महाशिवरात्री आधीच चमत्कार! देऊरवाडा येथे जमिनीच्या आत सापडले पुरातन शिव मंदिर

अमरावती : काही दिवसांपूर्वी भिवंडीमध्ये पांडवगडावरील कुंडात पुरातन शिवलिंग सापडले होते. त्यानंतर आता अमरावती तालुक्यातील श्री क्षेत्र देऊरवाडा येथे पूर्णा व मेगा नदीच्या संगमाजवळ, पूर्णा नदीच्या काठी शेकडो वर्षांपूर्वीचे पुरातन शिवमंदिर जमिनीत आढळून आले आहे. (Ancient Shiv Temple)

Gargai water project : गारगाई पाणी प्रकल्प तब्बल १२ वर्षांनंतरही कागदावरच

देऊरवाडा हे गाव पुरातन व धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी पुरातन नृसिंह मंदिर देखील आहे. नृसिंहाने हिरण्यकश्यपु राक्षचाचा वध केल्यानंतर आपली रक्ताने माखलेली नखे पयोष्णी नदीमध्ये या ठिकाणी साफ झाली होती. शिवपुराणातील पयोष्णी नदीचे वर्णन करण्यात आले आहे. पूर्णा नदी म्हणजेच वैष्णवी नदी होय. या ठिकाणी पूर्णा नदी ही उत्तरवाणी असून या भागात १८ तीर्थ आहे. या १८ तीर्थाचे वर्णन पष्णवी ग्रंथामध्ये करण्यात आले. यात सोमतीर्थ, क्रोड तीर्थ, प्रवरतीर्थ, अमृत तीर्थ, गरुड तीर्थ, विशाल तीर्थ, लक्ष्मी तीर्थ, कपाल मोहन तीर्थ, अग्नी तीर्थ, पिशाच तीर्थ, भानू तीर्थ,कुत शौच महातीर्थ, बागेश्वरी तीर्थ, चक्र तीर्थ ,पितृ तीर्थ, कच तीर्थ, रुद्र तीर्थ ,उमातीर्थ असे १८ तीर्थ आहे.

या १८ तीर्थापैकी, पूर्णा नदीच्या काठी सापडलेले पुरातन मंदिर भानू तीर्थ असल्याचे म्हटले जाते. हे मंदिर नृसिंह मंदिराच्या मागील मुस्लिम समाजाचे मो.अस्लम,शे आजम यांच्या शेतात सापडले आहे. हे मंदिर नदीकाठी जमिनीच्या आत असुन चुना, दगड, खरब आधी साहित्यांनी बांधण्यात आले आहे. वरून त्या मंदिरावर स्लॅप सारखे दिसून येते व मंदिराच्या आत मध्ये शंकराचे जुनी शिवलिंग आढळून आले. या मंदिराच्या दरवाज्याची कमान पूर्व दिशेला आहे. त्याचप्रमाणे वाळू दगडाने एक मूर्ती देखील मिळाली आहे. हे मंदिर पूर्णा नदीकाठी असल्याने पूर्वी , पूर्णा नदीला येत असलेल्या महापुराच्या गाळामुळे दाबून गेले असल्याचीही चर्चा गावकऱ्यांमधून व्यक्त होत होती. या गावामध्ये अनेक मंदिरे असल्याने या गावाला देवाचा वाडा असेही म्हणतात. अशा या गावाचा धार्मिक पर्यटन म्हणून विकास होणे गरजेचे झाले असल्याचेही बोलले जात आहे. “जुन्या पष्णवी ग्रंथामध्ये १६ अध्यायामध्ये या तीर्थाचे वर्णन केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भरपूर दिवसापासून कुजबूज सुरू होती. अखेर गावातील काही युवकांनी पुढाकार घेत, जुन्या लोकांना विचारपूस करीत, त्यांचा सल्ला घेत व त्यानुसार शेतमालकाला भेटून, शेतमालकाची परवानगी घेऊन अखेर श्रमदान करून, जमिनीच्या आत असलेले मंदिर अखेर उघडे पाडले.!” (Ancient Shiv Temple)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -