Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीकॅनडातून ४०० किलो सोनं लुटणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी ईडीची चंदिगडमध्ये कारवाई

कॅनडातून ४०० किलो सोनं लुटणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी ईडीची चंदिगडमध्ये कारवाई

चंदिगड : कॅनडातून सुमारे ४०० किलो सोनं लुटणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी ईडीने चंदिगडमध्ये कारवाई सुरू केली आहे. आरोपी सिमरन प्रीत पनेसर चंदिगडमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच ईडीने धाड टाकली. पण तो सापडला नाही. ईडीने आरोपी सिमरन प्रीत पनेसर विरोधात परदेशात दरोडा टाकल्याचा आणि आर्थिक अफरातफरीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे.

कायद्यातील तरतुदीनुसार ईडीला भारतीय नागरिकावर परदेशात गुन्हा केल्याचा आरोप होत असल्यास तपासाचा अधिकार आहे. याच अधिकारात ईडीने तपास सुरू केला आहे. आरोपी सिमरन प्रीत पनेसरवर २२५ कोटी कॅनेडिअन डॉलर एवढ्या किंमतीचं सोनं लुटल्याचा आरोप आहे. हे सोनं अद्याप सापडलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, पनेसरने त्याच्या मदतनीसांच्या सहकार्याने टोरंटो विमानतळावरुन २०२३ मध्ये ०.९९९९ टक्के शुद्ध सोन्याचे ६६०० बार म्हणजेच सुमारे ४०० किलो वजनाचे सोने पळवून नेले. स्विर्त्झलंडमधील झुरिच येथून सोन्याचा साठा मालवाहक विमानाने कॅनडात आला. विमान कॅनडात उतरताच सोन्याचा साठा एका कंटेनरमध्ये भरण्यात आला.

सिमरन प्रीत पनेसरचे सहकारी विमानतळाच्या गोदामात काम करत होते. याच सहकाऱ्यांच्या मदतीने बँकेत जाणार असलेला सोन्याचा साठा भरलेला कंटेनर सिमरन प्रीत पनेसरने गायब केला. बनावट कागदपत्रांच्या मदतीने गायब केलेला हा कंटेनर अद्याप सापडलेला नाही. या प्रकरणात सिमरन प्रीत पनेसरचा सहकारी परमपाल सिद्धू ब्रांप्टन याला अटक झाली. पण सिमरन प्रीत पनेसर अद्याप सापडलेला नाही. कॅनडा पोलीस त्याला शोधत आहेत. भारत सरकारला मिळालेल्या माहितीनुसार सिमरन प्रीत पनेसर कॅनडातून पळून भारतात चंदिगडमध्ये लपला आहे. ही माहिती मिळताच ईडीने कारवाई केली. पण सिमरन प्रीत पनेसर सापडला नाही. यामुळे ईडीने सिमरन प्रीत पनेसरसाठीची शोध मोहीम सुरू ठेवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -