Saturday, March 15, 2025
Homeमनोरंजननाट्यपट'रणरागिणी ताराराणी' नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

मुंबई : फुलांची आकर्षक सजावट, सनई-चौघडयांचे मंगलमय सूर, शेकडोंच्या संख्येने उपस्थित प्रेक्षक, आणि सोबत जिजाऊंच्या ओव्या अशा पवित्र वातावरणात ‘रणरागिणी ताराराणी’ या नाटकाचा शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहणे म्हणून आमदार महेश सावंत, निर्माता – दिग्दर्शक अशोक हांडे, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, कॅप्टन शिवाजी महाडकर, लेखक सुखद राणे आणि कार्यकारणी मंडळाचे सदस्य तसेच सामाजिक, राजकीय आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी ‘रणरागिणी ताराराणी’ नाट्यनिर्मितीचे उचलेले शिवधनुष्य खरंच कौतुकास्पद आहे. हे नाटक बघण्याचा मला भाग्य लाभलं याचा आनंद आहे. ‘छावा’ चित्रपट जसा हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे तसं ‘रणरागिणी ताराराणी’ हे नाटक हाऊसफुल्ल गर्दी करेल, असा विश्वास व्यक्त करताना आमदार महेश सावंत यांनी या खास प्रयोगाला आमंत्रित केल्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) चे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे आभार मानले. संपूर्ण नाट्यगृह ‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला भरलेले पाहायला मिळाले ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून हा इतिहास सर्वदूर पोहचावा यासाठी आम्ही घेतलेल्या प्रयत्नांना नाट्यरसिकांची अशीच साथ लाभेल असा आशावाद श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) चे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी प्रमुख पाहणे असलेल्या आमदार मा.महेश सावंत आणि त्यांच्या पत्नीचा स्मृतिचिन्ह आणि ‘ताराराणी’ पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. अशॊक हांडे, नरेंद्र पाटील या मान्यवरांना ‘ताराराणी पुस्तकरूपी’ भेट देण्यात आली. सुखद राणे यांच्या ‘ये देशीचे दुर्ग’ या पुस्तकाचे अनावरण यावेळी करण्यात आले.

‘रणरागिणी ताराराणी’ यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजीस्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे. ‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाची संकल्पना चंद्रकांत सावंत यांची असून निर्माते ब्रिगेडियर सुधीर सावंत आहेत. लेखन युवराज पाटील तर दिग्दर्शन विजय राणे यांचे आहे. या शुभारंभाच्या प्रयोगानंतर पुढील प्रयोग शुक्रवार २१ फेब्रुवारी रात्रौ. ८. ३० वा.( क्रां वासुदेव फडके पनवेल), शनिवार २२ फेब्रुवारी दुपारी ४.३० वा (आचार्य अत्रे कल्याण), रविवार २३ फेब्रुवारी रात्रौ. ८. ३० वा ( कालिदास नाट्यमंदिर मुलुंड ), सोमवार २४ फेब्रुवारी सायं ७. ३०( श्री छत्रपती शिवाजी मंदिर दादर ) येथे रंगणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -