इंफाल : मणिपूरमध्ये गेल्या २४ तासांत ४ जिल्ह्यांमधून अनेक बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित १७ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती इंफाल पोलिसांनी आज दिली. (Manipur Terrorists)
IPL 2025 : चला भेटू, वानखेडे ला… म्हणत इंडियन जर्सीचा नवा लुक समोर!
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, राज्याच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग कियाम लीकाई भागातून बंदी घातलेल्या कांगलेई यावोल कन्ना लुप (केवायकेएल) संघटनेशी संबंधित १३ दहशतवाद्यांना गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २७ जिवंत काडतुसे, ३ वॉकी-टॉकी सेट, कॅमफ्लाज युनिफॉर्म आणि इतर सामरिक वस्तू देखील जप्त करण्यात आल्या, आहेत. त्याचप्रमाणे इंफाल-पूर्व जिल्ह्यातील न्गारियन चिंग भागातून प्रतिबंधीत युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या (पी) एका दहशतवाद्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटकेतील आरोपी खंडणीच्या गुन्ह्यात लिप्त होता. तसेच सुरक्षा दलांनी गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यातील न्गाईखोंग खुल्लान भागातून कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी (सिटी मेइतेई) च्या एका कार्यकर्त्यांला अटक केली.काकचिंग जिल्ह्यातील काकचिंग सुमक लीकाई भागातून पोलिसांनी खंडणीच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कांगलेई यावोल कन्ना लुपच्या (केवायकेएल) सक्रिय कार्यकर्त्यांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी इंफाल- पश्चिम जिल्ह्यातील फिडिंगा येथून केसीपीच्या (पीडब्ल्यूजी) एका कॅडरला देखील अटक केली आहे. (Manipur Terrorists)