Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीउत्तरप्रदेश सरकारचा अर्थसंकल्प जाहीर

उत्तरप्रदेश सरकारचा अर्थसंकल्प जाहीर

अर्थसंकल्पात रस्ते आणि विद्यार्थ्यांना प्राधान्य

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचा ९ वा अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभेत सादर करण्यात आला. उत्तरप्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी ८ लाख ८ हजार ७३६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सरकारने सादर केला. या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा आणि योजना सरकारने मांडल्या याशिवाय, सरकारी आणि खाजगी क्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालये/वैद्यकीय संस्था/विद्यापीठे स्थापन करण्यासाठीही अर्थसंकल्पात व्यवस्था करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी विधानसभेत २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तरुणांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. आणि राज्याची वाहतूक सुरळीत होण्यासाठी ४ नवीन एक्सप्रेस वे बांधण्याचा निर्णय घेतला.

तरुणांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या आकर्षक घोषणा

⦁ उत्तर प्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पात तरुणांना व्याजमुक्त कर्ज दिले जाईल.

⦁ स्टार्टअप्स आणि उद्योगांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची तरतूद.

⦁ विद्यार्थिनींना स्कूटी देण्याची तरतूद.

राज्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चार नवीन एक्सप्रेसवे

⦁ गंगा एक्सप्रेसवेला प्रयागराज, मिर्झापूर, वाराणसी आणि चंदौली मार्गे सोनभद्रशी जोडण्यासाठी एक्सप्रेसवेच्या बांधकामासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद.

⦁ मेरठला शहराला हरिद्वारशी जोडण्यासाठी गंगा एक्सप्रेस वे च्या विस्तारीकरणासाठी ५० कोटींचा निधीची तरतूद.

⦁ आगरा-लखनऊ एक्सप्रेस-वे पासून गंगा एक्सप्रेस-वे कौसिया व्हाया फर्रुखाबाद पर्यंत एक ग्रीन फील्ड एक्सप्रेस-वे बांधण्यात येणार आहे ,ज्यासाठी 900 कोटी रुपये निधीची तरतूद.

⦁ बुंदेलखंड ते रिवा प्रस्तावित एक्सप्रेस-वे साठी 50 कोटी रुपयाची तरतूद.

⦁ प्रस्तावित संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी अंदाजे ४६१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याअंतर्गत राज्यात सुमारे साडे नऊ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -