Thursday, March 27, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वअसे ओळखा तोतया विमा एजंट

असे ओळखा तोतया विमा एजंट

मुंबई : विम्यातील फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे आणि घोटाळेबाज अधिकाधिक चलाख होत चालले आहेत. तुम्ही जर बनावट विमा एजंटचे शिकार झालात, तर जेव्हा तुम्हाला विम्याची निकड असेल तेव्हा तुम्हाला त्याचे कव्हरेज मिळणार नाही. विमा फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणाचे गांभीर्य लक्षात घेऊन इन्शुरन्स देखो या भारतातील आघाडीच्या ब्रँडने लोकांना सतर्क राहून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मदतरूप ठरू शकतील असे पाच मुख्य इशारे दिले आहेत. जर तुम्हाला ही भविष्यात तोतया विमा एजंटद्वारे देण्यात येणा-या पुढीलपैकी एखाद्या आकर्षक ऑफरचा अनुभव आला तर तुम्ही स्वतःला होणा-या संभाव्य धोक्यापासून वाचवू शकता.

Pune News : पुण्यात इलॉन मस्कची एन्ट्री; टेस्ला कंपनीचा प्लांट उभारणार

१. ऑफर खूपच आकर्षक आहे याचा अर्थ ती बनावट असू शकते : जर एखाद्या विम्याच्या प्लानमध्ये अवास्तव कमी प्रीमियममध्ये उच्च परताव्याची हमी असेल किंवा ‘खास’ सौदे असतील तर सतर्क व्हा. अस्सल पॉलिसी असतात त्यामध्ये जोखमी असतात आणि मानक शर्तीही असतात. जर एखादा प्लान खूपच छान वाटत असेल, तर तो खरा नसण्याचीच शक्यता असते.

सरकारी नोकरी शोधताय? तर ही बातमी तुमच्या कामाची

2. फक्त रोख पेमेंट्स : एक कायदेशीर विमा कंपनी कधीच रोख पेमेंट्सची किंवा व्यक्तिगत खात्यात पैसे स्थानांतरित करण्याची मागणी करत नाही. जे घोटाळेबाज असतात तेच स्वतःचा माग न ठेवण्यासाठी रोख किंवा अवैध पेमेंट पद्धती पसंत करतात. त्यामुळे पेमेंट्स थेट अधिकृत कंपनी खात्यात जातील याची नेहमी खातरजमा करा.

3. डिजिटल किंवा अधिकृत उपस्थिती नसणे : संपूर्ण जग आता डिजिटल झाले आहे आणि अस्सल विमा व्यावसायिकांची ऑनलाइन उपस्थिती असतेच. जर एखाद्या एजंटचे लिंक्डइन प्रोफाइल नसेल, तो जर कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध नसेल किंवा विमा प्राधिकारणात त्याची नोंदणी झालेली नसेल तर सावध व्हा. पुढे जण्यापूर्वी विमा कंपनीकडे त्याची ओळखपत्रे अवश्य पडताळून बघा.

4. अव्यावसायिक कम्युनिकेशन : कायदेशीर एजंट कंपनीने त्यांना दिलेला ईमेल अॅड्रेस वापरतात. Gmail, Yahoo किंवा विचित्र दिसणारा ईमेल वापरणाऱ्या एजंट्स पासून सावध रहा. तसेच, घोटाळेबाज अधिकृत कम्युनिकेशन मार्गांऐवजी WhatsApp आणि सोशल मीडियावर विसंबून असतात. विमा प्रदात्याशी अधिकृत संपर्क तपाशीलांची पुष्टी अवश्य करा.

5. खूप दबाव आणून विक्री करण्याची रणनीती : घोटाळेबाज नेहमी घाईघाई करतात. खालीलप्रमाणे विधाने करून तुम्हाला झटपट कृती करण्यास भाग पडतात:

अ “ही ऑफर आजच संपत आहे!”

ब “हा खास दर लॉक करण्यासाठी आजच पेमेंट करा!”

क “तुम्ही तत्काळ कृती केली नाही, तर तुम्ही राहून जाल!”

जो एजंट नोंदणीकृत असेल, तो तुम्हाला पुनरावलोकन करण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि एक माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी वेळ देईल.

स्वतःचे संरक्षण कसे कराल ?

1 अधिकृत विमा नियामक संस्थेमार्फत त्या एजंटचा परवाना पडताळून बघा.

2 त्या एजंटच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी विमा कंपनीशी थेट संपर्क साधा.

3 रोख पेमेंट्स करण्याचे टाळा, फक्त अधिकृत कंपनी चॅनल्सचाच उपयोग करा.

4 वैधतेसाठी ऑनलाइन रिव्ह्यू, सरकारी लिस्टिंग आणि सोशल मीडिया तपासून बघा.

5 आपल्या सहज-प्रेरणेवर विश्वास ठेवा, काही गडबड वाटली तर कृती करण्याअगोदर तपास करा.

सतर्क रहा, प्रश्न विचारा आणि नेहमी खरेदी करण्याअगोदर पडताळून बघा. तुमची आर्थिक सुरक्षा यावरच अवलंबून आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -