ISRO : इस्त्रोचे मोठे यश, चंद्रयान-३च्या लँडरचा सुखद धक्का

नवी दिल्ली  : विक्रमची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाली असून मिशन पूर्ण झाले आहे.चंद्रयान-३च्या लँडरचा सुखद धक्का आहे. ही कामगिरी इस्त्रोचे मोठे यश मानले जाते. ऑगस्ट २०२३ मध्ये चंद्रयान-३ च्या लँडर विक्रमने सॉफ्ट लॅडिंग केली होती. त्यानंतर अंतराळाच्या इतिहासात नवीन आध्याय जोडला गेला होता. या मिशनमध्ये भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) वैज्ञानिकांना एका नवीन आव्हानांचा सामना करावा लागला होता. विक्रमकडे अजून काही प्रोपेलेंट शिल्लक होते. त्यावेळी इस्त्रोमधील काही शास्त्रज्ञांचे मत होते की ते असेच वाया जाऊ नये. त्याच वेळी काही शास्त्रज्ञ म्हणत होते की, अभियान आधीच यशस्वी झाले आहे आणि आता कोणत्याही अतिरिक्त प्रयोगांची गरज नाही. यामुळे दोन मतप्रवाहन निर्माण झाले.
शेवटी इस्त्रोने आपल्या योजनेत बदल केला. चंद्रावर विक्रम लँडरचा अप्रत्याशित ‘हॉप’ (उडी मारणे) प्रयोग करण्यात आला. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून ४० सेंटीमीटरवर उठला. त्यानंतर जवळपास ३०-४० सेंटीमीटर लांब जावून लँड झाला. विक्रम लँडरने मारल्या या उडीमुळे इस्त्रोचा वैज्ञानिकांना सुखद धक्का बसला. तसेच भविष्यासाठी चांगले संकेत मिळाले.



इस्त्रो प्रमुख व्ही. नारायणन हे सुद्धा त्यावेळी चंद्रयान - ३ मिशनमधील प्रमुख वैज्ञानिकांमध्ये होते. त्यांनी त्या दिवशाची आठवण करताना सांगितले की, लँडिंगच्या दिवशी खूप तणाव होता.परंतु, प्रोपेलेंट प्राणालीने पूर्ण काम केले.त्यानंतर चंद्रयान-३ चे लँडिंग झाले.हे मिशनचे मोठे यश होते. विशेष प्रोपेलेंटचा वापर करण्यासाठी त्यांनी इस्त्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ यांच्यासोबत चर्चा केली होती; परंतुत्यावेळी मिशनमध्ये सहभागी काही शास्त्रज्ञांनी या प्रयोगात रुची दाखवली आहे. याबाबत त्यांचे म्हणणे होते, विक्रमची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाली आहे.त्यामुळे मिशन पूर्ण झाले आहे.अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमधील व्याख्यानात बोलताना नारायणन यांनी ही आठवण सांगितली.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे