ठाणे : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली मंगळवारी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे बैठक संपन्न झाली. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी जिल्हा प्रशासनासंदर्भांतील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी मोलाची भूमिका बजावणार असल्याचे प्रास्तिविकात सांगितले. केंद्र सरकारच्या अंतर्गत राबविणाऱ्या योजना विविध विभागांना दर्जेदार पायाभूत सुविधांची कामे सुनिश्चित करून आणि योजना त्यांच्या इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भिवंडी व उल्हासनगर शहरांमध्ये स्वच्छते संदर्भात कामकाज करण्यासाठी आराखडा तयार करून आणि निश्चित केलेल्या कालावधीत कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.
Pramod Mahajan Garden : प्रमोद महाजन कला उद्यानाला अधिक सुंदर बनवण्याची आयुक्तांची ग्वाही
ठाणे ग्रामीणअंतर्गत येणाऱ्या ४३१ ग्रामपंचायतींमध्ये भारत नेट प्रोजेक्ट व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन सेवा ग्रामीण भागात पुरविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, यासंदर्भात विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी मार्गदर्शन केले. ठाणे जिल्ह्यातील वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय यांचे उद्देश निश्चित करून कामकाज वेळेत पुर्ण करण्यासंदर्भांत जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. अशा सुचना जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले. यावेळी खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती नरेश गणपत म्हस्के, खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य डॉ. बालाजी किणीकर, आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगरपालिका प्रशांत रोडे, आयुक्त मीरा भाईंदर महानगरपालिका अनिलकुमार पवार, आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका मनिषा आव्हाळे, आयुक्त भिवंडी निजामपूर महानगरपालिका अनमोल सागर, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी आदी
उपस्थित होते.