विरार : छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आठ वर्षीय स्वयंतकने शिवजयंतीला समुद्रात सतत सहा तास २५ मिनिटे जलतरण केले. स्वयंतकच्या या उपक्रमाची महाराष्ट्र स्टेट स्विमिंग असोसिएशनने दखल घेतली आहे. महाराष्ट्र साहसी क्रीडा प्रकारात खाडी पोहणे या क्रीडा प्रकाराचा शासनाच्या सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जलतरण करणाऱ्या अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या विक्रमाची नोंद आपल्या नावे करण्यासाठी तयारी चालविली आहे. वसई तालुक्यातील उमेळमान येथील रहिवासी स्वयंतक पंकज पाटील हा तिसरीचा विद्यार्थी असून तो प्रशिक्षक राकेश कदम यांच्या मार्गदर्शनात जलतरणाचे धडे गिरवत आहे.
Nagpur News : बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग
अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला या २२ किलोमीटरचे अंतर समुद्रात जलतरण करण्याचा त्याचा मानस होता. यासाठी त्याने व त्याच्या प्रशिक्षकांनी शिवजयंतीचा मुहूर्त साधला. महाराष्ट्र राज्य स्विमिंग असोसिएशन आणि राज्य बंदर विभागासह आवश्यक त्या परवानगी यासाठी घेण्यात आल्या. १९ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता स्वयंतक पाटीलने समुद्रामध्ये जलतरण करण्यास सुरुवात केली. अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला या २१.७८ किलोमीटरचे अंतर स्वयंतकने ६.२५ मिनिटांमध्ये जलतरण करून पार केले. महाराष्ट्र राज्य स्विमिंग असोसिएशनचे शैलेश सिंग, नंदन वर्तक, प्रशिक्षक राकेश कदम, पंकज पाटील आणि परिसरातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते